स्वागतकक्ष

महिलाविश्व – केवळ महिलांसाठी सुरक्षित ऑनलाईन व्यासपीठ

महिलांच्या साहित्य, व्यवसाय, कलागुणांना प्रसिद्धी देऊन वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी

फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सारख्या सध्याच्या लोकप्रिय परंतु परदेशी प्रसारमाध्यमांना एक सशक्त व समृद्ध भारतीय पर्याय

महिलाविश्व

वेबसाईट व ॲपच्या स्वरुपात ज्ञानदीपने सादर केलाअसून त्याचा महिलांनी आवर्जून वापर करावा ही विनंती.

या वेबसाईटच्या संपादनाचे तसेच त्यात वेळोवेळी सुधारणा व नव्या सुविधा देण्याचे कार्य ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ही कंपनी करणार असून ज्ञानदीप फौंडेशनच्या अधिकृत सदस्यांना स्वतःची छोटी वेबसाईट तयार करून त्यांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण मोफत दिले जाईल.

या वेबसाईटवरील वैयक्तिक माहिती, लेख वा इतर साहित्य कोणास व किती दाखवायचे याचा अधिकार त्यांच्याकडे राहणार असून महिलाविश्व प्रसिद्धी व नवीन सदस्य नोंदणीसाठी यथोचित मानधन दिले जाईल. सध्या या वेबसाईटचे माध्यम मराठी असले तरी सदस्यांना इंग्रजी वा इतर भाषांमध्ये आपले साहित्य प्रसिद्ध करता येईल.

सदस्य नसणा-या इतर सर्वांसाठी या वेबसाईटवरील सार्वजनिक वितरणासाठी असलेले महिलांनी लिहिलेले लेख वा इतर साहित्य वाचता येईल. तसेच अभिप्राय व सूचना देता येतील. आपल्या सक्रीय सहभागातून आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचविण्यात ज्ञानदीप फौडेशन यशस्वी होईल असा मला विश्वास आहे.

धन्यवाद,
डॉ. सु. वि. रानडे, अध्यक्ष, ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फौंडेशन, सांगली.

प्रास्तविक

जीवनाच्या सर्व क्षेत्रात सध्या पुरुषांचे वर्चस्व आहे. महिला पुरुषांइतक्याच कर्तबगार असल्या तरी त्यांना कौटुंबिक जबाबदा-यांमुळे घर सांभाळावे लागते. मुलांचे संगोपन करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कर्तबगारीवर नैसर्गिक व परिस्थितीची बंधने पडतात.

सुदैवाने सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात महिलांना आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदा-या सांभाळून घरबसल्या इंटरनेटच्या साहाय्याने नोकरी, व्यवसाय करणे शक्य झाले असून आपल्या कलागुणांना वाव देऊन सामाजिक व शैक्षणिक कार्यातही महत्वाचे योगदान देता येऊ लागले आहे.

ज्ञानदीपच्या संचालिका कै. सौ. शुभांगी रानडे यांनी संस्कृत शिक्षिका असूनही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये प्राविण्य मिळवून संगणक प्रशिक्षण तसेच मराठी माध्यमातून वेबसाईट आणि सॉफ्टवेअर निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.या कार्याचा मागोवा घेऊन असे कार्य पुढेही चालू रहावे या दृष्टीकोनातून ज्ञानदीप फौंडेशनने शुभांगी आयटी प्रशिक्षण मंडळ या नावाचे केवळ महिलांसाठी एक इंटरनेट आधारित व्यासपीठ सुरू केले आहे.

श्री. शंकरराव किर्लोस्कर यांच्या ‘स्त्री’ मासिकाच्या मासिकाच्या वाटचालीचा आढावा हा श्रीमती शांता किर्लोस्कर यांच्या लेखावरून असा उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. आता छापील मासिकाऐवजी डिजिटल मिडियावर दृकश्राव्य माध्यमासहित असे व्यासपीठ जागतिक स्तरावर जाऊ शकेल.

फेसबुक वा ऴ्हॉट्स अॅपसारख्या परकीय नियंत्रित सुविधांना महिलांसाठी एक सुरक्षित पर्याय म्हणून या वेबसाईटचा उपयोग व्हावा असे वाटते.

आता छापील मासिकाऐवजी डिजिटल मिडियावर दृकश्राव्य माध्यमासहित असे व्यासपीठ जागतिक स्तरावर जाऊ शकेल. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यासाठी मायमराठी डॉट कॉम ही वेबसाईट ज्ञानदीपने कार्यान्वित केली आहे.

या वेबसाईटच्या व्यवस्थापनात तसेच नवी माहिती, लेख व इतर सुविधांची निर्मिती करण्यात आपण इच्छुक असाल तर आपले स्वागत आहे. मराठी माध्यमातून यात माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असून मराठीचा इंटरनेटवर वापर वाढावा तसेच जागतिक स्तरावर मराठी भगिनींना यात सहभागी होता यावे अशी कल्पना आहे.

कृपया याबाबतीत इमेल वा फोनने संपर्क साधावा ही विनंती info@dnyandeep.net /+919422410520

धन्यवाद, – डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली