आशा भोसले या हिन्दी चित्रपटांच्या सुप्रसिध्द प्लेबॅक गायिका आहेत. त्यांना लोक “आशाजी” या नावाने ओळखतात.
आशाजींनी आपल्या करियर ची सुरूवात 1943 साली केली होती. त्यांनी आतापर्यंत हजारो गाणी गायली आहेत, त्यांनी स्वतःचे अल्बम देखील तयार केले आहेत.
आशा भोसले सुप्रसिध्द मंगेशकर घराण्याच्या सदस्या असुन महान गायिका लता मंगेशकर यांच्या धाकटया भगिनी आहेत.
आशा भोसले यांचे जीवनचरित्र –
आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली महाराष्ट्र येथे एका मराठा कुटूंबात झाला त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर हे एक शास्त्रीय गायक आणि संगितकार होते, आशाजी 9 वर्षाच्या असतांना त्यांच्या वडीलांचा ह्नदयविकाराने मृत्यु झाला त्यामुळे घरातील सर्व जवाबदारी मोठया बहिणीवर म्हणजे लता मंगेशकर आली.
गायकीच्या क्षेत्रात असल्यामुळे मंगेशकर कुटुंब मुंबईला आले आणि तेथेच स्थायीक झाले. लता मंगेशकर यांनी अभिनय आणि गायनाच्या क्षेत्रात प्रवेश केला होता त्यामुळे घराचा उदरनिर्वाह सुरळीत चालला होता.
आशाजींनी आपले पहिले गाणे ‘माझा बाळ’ या चित्रपटाकरता गायले होते. त्यांचे पहिले हिन्दी गाणे 1948 साली चुनरिया या चित्रपटाकरता ‘सावन आया’ हे होते. त्यांनी आपले पहिले सोलो गाणे “रात की रानी” या चित्रपटातील “आयेगा आयेगा” हे गाणे गायले होते.
त्यानंतर आशाजींनी कधीच मागे वळुन पाहिले नाही. त्यांनी अनेक भाषांमध्ये गायन केले आहे शास्त्रीय संगीत, कव्वाली, भजन, गजल, गंभीर गाणे असो वा रोमांटिक सर्व प्रकारची हजारो गाणी गायिली. त्यांच्या नावे 12000 पेक्षा जास्त गाण्यांचा विक्रमही आहे. त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड मधेही समाविष्ट झाले आहे, त्यांनी 20 भारतीय आणि 12 विदेशी भाषांमध्ये गायन केलं आहे.
भारत सरकार ने आशाजींच्या या विक्रमासाठी त्यांना 2000 साली ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार आणि 2008 मधे पद्म विभुषण अवार्ड देउन सन्मानित केले आहे.
2013 साली मराठी चित्रपट ‘माई’ मध्ये प्रथमच त्यांनी चित्रपटांत अभिनय केला.
व्यक्तिगत जीवन – Asha Bhosle Biography in Marathi
आशाजींचे घर दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात प्रभुकुंज अपार्टमेंट मध्ये स्थित आहे. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी 31 वर्षीय प्रियकर ‘गणपतराव भोसले’ जे लताजींचे मॅनेजर होते त्यांच्याशी पळुन जाउन विवाह केला.
त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. तिसरे अपत्य गर्भात असतांना त्या आपल्या पतिपासुन विभक्त झाल्या आणि आपल्या आईकडे परत आल्या.
त्यांचा सर्वात मोठा मुलगा हेमंत एक प्रोफेशनल पायलट आणि एक संगितकारही आहे. त्यांची कन्या वर्षा हिने 8 ऑक्टोबर 2012 मध्ये आत्महत्या केली होती.
आशाजींचा सर्वात लहान मुलगा आनंद भोसले एक यशस्वी व्यावसायिक आहे.
सध्या आशाजी त्यांच्याचकडे राहातात, हेमंत भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र चिंटू जगप्रसिध्द बॅंड “बायबॅंड” चे सदस्य आहेत.
आशाजींसह लता दिदिंना उषा मंगेशकर आणि मिना मंगेशकर हया दोन भगिनी आणि ह्नदयनाथ मंगेशकर हे सर्वात कनिष्ठ बंधु ही आहेत, हे सर्व अभिनय आणि गायन क्षेत्राशी संबंधीत आहेत.
1960 नंतर आशाजींनी आपल्या परिवाराकरता परत गायनावर लक्ष केंद्रित केले. 1980 साली प्रसिध्द संगितकार “राहुलदेव बर्मन” यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. राहुल देव बर्मन यांच्यासोबत त्या त्यांच्या मृत्युपर्यंत सोबत होत्या.
आशा भोसले एक उत्तम सुगरणही आहेत, आशाजींच्या हातांनी बनवलेल्या कढई गोस्त, बिर्याणी, पाया करी, गोझन फिशकरी आणि दालफ्राय संपुर्ण फिल्म इंडस्ट्री मधे फार पसंत केले जातात.
टाईम्स ऑफ इंडिया च्या साक्षात्कारात त्यांना प्रश्न विचारला गेला होता की ‘जर तुम्ही गायिका नसत्या तर काय असत्या?’ तेव्हां आशाजींनी उत्तर दिले की मी उत्तम कुक बनले असते.
आशाजींचे चार रेस्टॉरंट ही आहेत. हे रेस्टाॅरंट दुबई, सिंगापुर, कुवैत, आणि मुंबई अशा नावाजलेल्या ठिकाणी आहेत. वाफा गृपच्या रेस्टॉरंट मधे त्यांची 20% भागीदारी आहे. येथील कुक्स ना आशाजींनी 6 महिन्याचे प्रशिक्षण स्वतः दिले आहे.
1997 मध्ये ब्रिटिश लोकप्रीय बॅंड ने एक गाणे रिलीज केले जे आशाजींना समर्पीत होते.
फिल्म फेयर अवार्ड
आशा भोसले यांना एकुण 18 नॉमिनेशनस् पैकी 7 फिल्म फेयर अवार्ड मिळाले आहेत, त्यांनी आपले पहिले अवार्ड 1967 मधे मिळवले होते.
फिल्म फेयर बेस्ट प्लेबॅक अवार्ड
- 1968 ‘गरिबो की सुनो’ हे गित दस लाख या चित्रपटातील (1966)
- 1969 मध्ये ‘परदे मे रहने दो’ या गितासाठी चित्रपट ‘शिखर’ (1968)
- 1972 ‘पिया तु अब तो आजा’ या गितासाठी चित्रपट ‘कारवा’ (1971)
- 1973 ‘दम मारो दम’ या गितासाठी चित्रपट ‘हरे रामा हरे क्रिष्ना’ (1972)
- 1974 ‘होने लगी है रात’ या गितासाठी चित्रपट ‘नैना’ (1973)
- 1975 ‘चैनसे हमको कभी’ या गितासाठी चित्रपट ‘प्राण जाये पर वचन न जाये’ (1974)
- 1979 ‘ये मेरा दिल’ या गितासाठी चित्रपट ‘डॉन’ (1978)
राष्ट्रीय फिल्म फेयर अवार्ड
- आशाजींनी 2 वेळा राष्ट्रीय फिल्म फेयर अवार्ड बेस्ट प्लेबॅक सिंगर साठी जिंकले आहे.
- 1981 ‘दिल चीज क्या है’ या गितासाठी चित्रपट उमराव जान.
- 1986 ‘मेरा कुछ सामान’ या गितासाठी चित्रपट इजाजत.
IIFA अवार्ड बेस्ट फिमेल प्लेबॅक साठी
- 2002 बेस्ट फिमेल प्लेबॅकसाठी लाईफ टाईम अचीव्हमेंट अवार्ड.
- 2001 फिल्म फेयर लाइफटाइम अचिवमेंट अवार्ड.
- 1987 नाईटेंगल आॅफ एशिया अवार्ड
- 1989 लता मंगेशकर अवार्ड (मध्यप्रदेश सरकार)
- 1997 स्क्रीन व्हिडीयोकाॅन अवार्ड (जानम समझा करो – अल्बम)
- 1998 दयावती मोदी अवार्ड (गुजरात सरकार)
- लता मंगेशकर अवार्ड (महाराष्ट्र सरकार)
- 2000 सिंग ऑफ दी मिलीनीयम अवार्ड (दुबई)
- 2001 एम.टि.व्ही. अवार्ड (कम्ब्ख्त इश्क या गितासाठी)
- 2002 बी.बी.सी. लाइफटाईम अचीव्हमेंट अवार्ड (इंग्लंडच्या पंतप्रधानांव्दारे सन्मानित)
- 2004 लाईविंग लिजंड अवार्ड
- 2005 मोस्ट स्टाईलीश पिपल इन म्युझीक अवार्ड
सन्मान आणि ओळख
- 1997 मधे आशाजी “ग्रेमी अवार्ड” करता नामांकित होणा.या पहिल्या भारतिय गायिका बनल्या
- आशाजींनी सत्तरावा महाराष्ट्र स्टेट अवार्ड प्राप्त केला
- भारतीय सिनेमात उत्कृष्ट योगदानासाठी सन् 2000 मधे “दादा साहेब फाळके अवार्ड” प्राप्त केला.
- अमरावती व जळगाव विद्यापिठाने त्यांना साहित्यातील डॉक्टरेट उपाधी देउन सन्मानित केले आहे.
- नोव्हेंबर 2002 मध्ये आशाजीस “बर्मिंघम फिल्म फेस्टिवल” मध्ये विशेष रूपात सन्मानित केले गेले.
- भारत सरकारने त्यांना “पद्म विभुषण” पुरस्काराने सन्मानित केले आहे.
- 2011 मध्ये जगात सर्वाधिक 12000 पेक्षा जास्त गाणे रेकाॅर्ड केल्याबद्दल गिनीज बुक आॅफ रेकाॅर्ड ने याची नोंद केली.
आजही आशाजी संगीताचा सराव करतात त्यांच्या आवाजात आजही एक वेगळी जादु आहे जी आजवरही टिकुन आहे.