बॅडमिंटन पटु सायना नेहवाल ने आपल्या खेळातील प्रदर्शनाने केवळ भारतियांनाच नव्हें तर संपुर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे व आपल्यातील अद्भुत प्रतिभेने भारताचे नाव अखिल विश्वात गौरविले आहे.
सायना भारताची सर्वश्रेष्ठ बॅडमिंटन खेळाडु आहे तिची गणना आज सर्वश्रेष्ठ खेळाडुंमध्ये होते. फार काळपर्यंत सायनाने जगातील क्रमांक 1 ची बॅडमिंटन खेळाडु म्हणुन गौरव प्राप्त केला आहे.
इतकेच नव्हें तर भारतात बॅडमिंटन खेळाची जी प्रसिध्दी झाली त्याचे श्रेय देखील सायनालाच दिले जाते.
या लेखात सायनाच्या आयुष्याविषयी आणि तिच्या कारकिर्दीबद्दल काही खास गोष्टी जाणुन घेउयां . . .
बॅडमिंटन पटु सायना नेहवाल जीवनाबद्दल काही खास गोष्टी –
सायना नेहवाल बद्दल थोडक्यात माहिती
नाव (Name) | सायना नेहवाल |
जन्म (Birthday) | 17 मार्च 1990, हिसार (हरियाणा) |
वडिलांचे नाव (Father Name) | हरवीर सिंह |
आईचे नाव (Mother Name) | उशा रानी |
पति (Husband Name) | पारूपल्ली कश्यप |
कोच/संरक्षक (Coach) | पुल्लेला गोपीचंद |
राष्ट्रीय पुरस्कार (Awards) | पद्मश्री, राजीव गाँधी खेलरत्न अवार्ड |
सायना नेहवाल चा जन्म, परिवार, शिक्षण आणि सुरूवातीचे जीवन –
संपुर्ण विश्वातील बेस्ट बॅडमिंटन खेळाडुं मधील एक असलेल्या सायनाचा जन्म भारताच्या हरियाणा राज्यातील हिसार येथील एका जाट कुटुंबात झाला आहे. तिचे वडील हरवीर सिंह, हरियाणा येथील एका अग्रीकल्चर युनिव्हर्सिटीत कार्यरत आहेत आणि आई उशा रानी देखील सायना सारख्याच एक बॅडमिंटन खेळाडु होत्या आणि त्या राज्यस्तरावर बॅडमिंटन खेळत असत.
सायनाचे वडिल सुध्दा राज्यस्तरावर बॅडमिंटन खेळाचे एक उत्तम खेळाडु म्हणुन प्रसिध्द होते. त्यामुळे आपण असं म्हणु शकतो की सायनात बॅडमिंटन खेळाची प्रतिभा आई-वडिलांकडुन वारसारूपाने मिळाली आहे.
सायना नेहवाल चे शिक्षण – Saina Nehwal Education
सायनाचे सुरूवातीचे शिक्षण हरियाणातील हिसार इथल्या शाळेमधुन झाले. पुढे वडिलांची बदली हैद्राबाद येथे झाल्याने संपुर्ण परिवार हैद्राबाद ला स्थानांतरीत झाला. त्यानंतर सायनाने आपली 10 वी ची परिक्षा फॉर्म सेंट ऐनी कॉलेज मेहंदीपट्टनम हैद्राबाद येथुन उत्तीर्ण केली.
सायना अभ्यासात एक हुशार विदयार्थिनी तर होतीच याशिवाय शालेय जिवनात ती खेळात देखील फार अक्टीव्ह असायची. शाळेत असतांना अभ्यासासमवेत तीने कराटेचं देखील शिक्षण घेतलं होतं त्यात तिला ब्राउन बेल्ट देखील मिळाला आहे.
फार कमी वयातच तीला बॅडमिंटन खेळात आवड निर्माण झाली. सायना एक सर्वोत्कृश्ट बॅडमिंटन पटू व्हावी अशी तिच्या वडिलांची फार ईच्छा होती. म्हणुनच तीचे वडिल तिला रोज शाळेत जाण्यापुर्वी सकाळी 4 वाजता उठवुन बॅडमिंटन च्या सरावाकरीता घेउन जात असत.
पुढे सायनाच्या वडिलांनी सायनाला प्रोफेशनल ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला आणि सायनाची भेट हैद्राबाद येथील लाल बहादुर स्टेडियम ला बॅडमिंटन कोच ‘‘नानी प्रसाद’’ यांच्याशी झाली. त्यांच्याकडुन तिने बॅडमिंटन चे धडे घेतले, त्यांनी तिला खेळातील काही अद्भुत गोष्टी शिकविल्या ज्याचा आज देखील ती खेळतांना उपयोग करते.
काही कालावधी नंतर उत्कृश्ट बॅडमिंटन पटु सायना नेहवाल ने द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द अश्या ‘‘एस.एम.आरिफ’’ यांच्याकडुन बॅडमिंटन चे अधिक उत्तम प्रशिक्षण घेतले. आपल्यातील खेळाला अधिकाधिक चांगले करण्याकरता सायनाने हैद्राबाद येथीलच ‘‘पुल्लेला गोपीचंद अकॅडमीत’’ प्रवेश घेतला. या ठिकाणी अत्यंत लोकप्रीय बॅडमिंटन खेळाडु आणि कोच गोपीचंद यांनी सायनाला बॅडमिंटन खेळातील बारकावे शिकवीलेत.
गोपीचंद यांनी देखील सायनाला सर्वोत्तम प्रशिक्षण देत देशाला एक उत्कृष्ट खेळाडु देण्यात आपले भरीव योगदान दिले. आजदेखील सायना नेहवाल पद्मश्री सन्मान प्राप्त प्रशिक्षक गोपीचंद यांना आपला आदर्श मानते.
सायना नेहवाल चा विवाह – Saina Nehwal Marriage
भारतिय बॅडमिंटन पटु सायना नेहवालने 14 डिसेंबर 2018 रोजी प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडु पारूपल्ली कश्यप समवेत विवाह केला. लग्नापुर्वी ते दोघे चांगले मित्र होते पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह करण्याचे ठरविले.
सायना नेहवालची सोनेरी कारकिर्द – Saina Nehwal Career
बॅडमिंटन पटु सायना नेहवाल ने जेव्हांपासुन आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली आहे अगदी तेव्हांपासुन आपल्या अद्भुत प्रतिभेने तीने क्रिडाप्रेमींच्या मनात आपली जागा कायम केली आहे. आणि त्यानंतर सायनाने कधीही मागे वळुन पाहिले नाही.
2003 साली सायनाने जिंकली पहिली टुर्नामेंट:
सायना नेहवाल ने 2003 साली झालेल्या ‘‘ज्युनियर सीजेक ओपन’’ स्पर्धेत आपली पहिली टुर्नामेंट खेळली आणि आपल्या सर्वोत्तम खेळाने त्यात ती यशस्वी ठरली.
काॅमनवेल्थ युथ गेम्स मध्ये 2004 साली झाली सहभागी:
2004 साली झालेल्या काॅमनवेल्थ युथ गेम्स मधे उत्कृश्ट प्रदर्शन करीत सायनाने दुसऱ्या स्थानावर यश संपादन केले.
2005 साली झालेल्या स्पर्धेने सायनाच्या नावाला प्राप्त झाली नवी झळाळी:
एशियन सॅटेलाईट बॅडमिंटन टुर्नामेंट मध्ये सायनाने अद्भुत खेळाचे प्रदर्शन करीत स्पर्धेत यश मिळवीले.
2006 मध्ये आपल्या खेळाने सर्वांना केले चकीत:
सुरूवातीपासुनच बॅडमिंटन खेळात आपली चमकदार कामगिरी करणाऱ्या सायनाने 2006 साली 4-स्टार टूर्नामेंट -फिलिपिन्स ओपन मध्ये भाग घेत येथे देखील उत्कृश्ट कामगिरी पार पाडली शिवाय वयाच्या अवघ्या 16 व्या वर्शी हा किताब नावावर करणारी भारत आणि एशिया ची पहिली अंडर-19 खेळाडु बनली. या व्यतिरीक्त याच वर्शी सायनाने पुन्हा एकदा सॅटेलाईट टुर्नामेंटवर आपले नाव कोरले.
2008 साली पुन्हा एकदा चमकदार कामगिरी:
लहान वयात आपल्या अद्भुत खेळाने मोठ मोठया दिग्गज खेळाडुंना विचार करायला भाग पाडणाऱ्या सायनाने आपल्या यशाची घौडदौड 2008 साली देखील कायम राखली. या वर्शी तीने ‘‘वल्र्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पीयनशिप ’’ हा किताब जिंकला आणि हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. एवढेच नव्हें तर 2008 साली सायनाने ‘‘इंडियन नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप’’ ‘कॉमनवेल्थ युथ गेम्स’ आणि ‘चायनीज टेपी ओपन ग्रांड प्रिक्स गोल्ड’ स्पर्धा देखील जिंकल्या.
2009 साली सायनाने आपल्या खेळाने रचला इतिहास:
आपल्यातील खेळाच्या उत्कृश्ट प्रदर्शनाने 2009 साली सायना नेहवाल ने केवळ इतिहासच रचला असे नव्हें तर क्रिडाप्रेमींच्या हृदयात आपली खास जागा निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली. 2009 साली जगातील सर्वात प्रमुख बॅडमिंटन सिरीज ‘‘इंडोनेशिया ओपन’’ हा किताब आपल्या नावावर केला. हा किताब जिंकणारी ती पहिली भारतिय खेळाडु ठरली.
याच वर्शी ‘‘वल्र्ड चॅम्पीयनशिप क्वार्टरफायनल’’ मध्ये पोहोचल्याने तीचे सगळीकडे कौतुक झाले. खेळातील अद्भुत प्रदर्शनाने तीला अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
2010 साली अनेक मोठया टुर्नामेंट सायनाने आपल्या खिशात घातल्या:
2010 साली देखील सायनाचा यशाचा आलेख चढता राहीला. या वर्शी तीने सिंगापुर ओपन सिरीज, इंडिया ओपन ग्रांड प्रिक्स गोल्ड, हाँगकँाग सुपर सीरीज, आणि इंडोनेशिया ओपन सुपर सीरीज सारख्या मोठया टुर्नामेंट आपल्या नावावर करून विश्वस्तरावर आपली ओळख निर्माण केली.
2011 साली देखील सायना राहीली प्रकाशझोतात:
भारताची सर्वोत्कृश्ट बॅडमिंटन खेळाडु सायना नेहवाल ने केवळ स्विस ओपन ग्रांड प्रिक्स गोल्ड, इंडोनेशिया ओपन सुपर सीरीज प्रीमियर, मलेशिया ओपन ग्रांड प्रिक्स गोल्ड सारख्या टुर्नामेंट जिंकल्या असे नव्हें तर ठॅथ् सुपर सीरीज मास्टर फाइनल्स मध्ये देखील आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
2012 साली लंडन ऑलंपिक मध्ये ब्राँन्ज मेडल जिंकुन भारताला केले गौरवान्वित:
भारताची स्टार खेळाडु सायना नेहवाल उत्तरोत्तर उत्तम खेळ करीत सलग नवनवीन रेकॉर्ड स्थापित करीत होती. या दरम्यान लंडन ऑलंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करीत सायनाने पहिल्यांदा या ऑलंपीक मध्ये ब्राँज पदक जिंकले आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. सायना पुर्वी लंडन ऑलंपिक मध्ये कुठल्याही भारतिय खेळाडुला हे पदक आजवर मिळाले नव्हते.
ब्राँज पदक मिळाल्यावर सायनाला अनेक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले शिवाय भारतातील अनेक राज्य जसे आंध्रप्रदेश सरकार कडुन सायना नेहवाल ला 50 लाख रूपये रोख बक्षीस, हरियाणा सरकार तर्फे 1 करोड रूपये रोख, राजस्थान सरकार तर्फे 50 लाख रूपये रोख, व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे 10 लाख रूपये रोख बक्षीस देण्यात आले.
या व्यतिरीक्त अद्भूत बॅडमिंटन खेळाडु सायना नेहवाल ला मंगलायतन युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टरेट पदवी ने सन्मानित करण्यात आले. सायना ला क्रिडामंत्रींनी IPS ऑफिसर स्तरावरचा जॉब देखील ऑफर केला होता. इतकेच नव्हें तर 2012 मध्येच सायना नेहवाल ने तिसरयांदा इंडोनेशियाई ओपन सुपर सिरीज प्रिमीयर किताब स्वतःच्या नावावर केला. शिवाय तीने थाईलंड ओपन ग्रांड प्रिक्स गोल्ड आणि स्विस् ओपन ग्रांड प्रिक्स जिंकुन भारताच्या सन्मानात भर घातली होती.
2014 साली सायनाने वल्र्ड चँपिंयनशिप जिंकली:
भारताची बॅडमिंटन क्वीन सायना नेहवाल ने 2014 साली आपली यशस्वीता कायम राखत भारताची विश्व चँपियन राहीलेली पी.व्ही. सिंधु ला हरवत इंडिया ओपन ग्रांड प्रिक्स गोल्ड टुर्नामेंट महिला एकेरीत यश मिळवत विश्वविजेती ठरली. सोबतच सायना याच वर्शी 7 व्या रँक पर्यंत सुध्दा पोहोचली.
या शिवाय सायना 2014 साली झालेल्या चायना ओपन सुपर सिरीज चा किताब आपल्या नावावर करणारी पहिली भारतिय महिला बॅडमिंटन खेळाडु ठरली.
2015 मध्ये BWF रँकिंग मध्ये सायनाला मिळाला विश्वातील क्रमांक 1 बॅडमिंटन खेळाडुचा दर्जा:
2015 साली 29 मार्च ला सायना ने इंडिया ओपन BWF सुपर सिरीज मधे सिंगल्स किताब जिंकला. बॅडमिंटन खेळात आपल्या अव्दितीय खेळाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या सायनाने 2015 ला सुध्दा आपली खेळातली जादु कायम ठेवली. याच वर्शी सायनाने ‘इंडिया ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड’ मध्ये आणि फायनल मधे महिला एकेरी स्पर्धेत स्पॅनिश खेळाडु कैरोलिना मरीना ला हरवत भारताचा गौरव वाढविला.
त्यानंतर 2015 साली झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपन चॅम्पियनशिप मधे सायना नेहवाल फायनल ला पोहोचणारी पहिली भारतिय महिला ठरली परंतु या टुर्नामेंट मध्ये सायनाला मरीना विरूध्द अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर 29 मार्च 2015 ला सायना ला ‘‘इंडिया ओपन BWF रँकिंग सुपर सिरीज व्दारे ‘‘वुमन सिंगल्स’’ चा खिताब देण्यात आला. यामुळे सायना बॅडमिंटन वल्र्ड फेडरेशन रँकिंग मधे विश्वातील क्रमांक 1 ची बॅडमिंटन खेळाडु झाली.
सायना करता संघर्शपुर्ण आणि आव्हानात्मक राहीले वर्ष 2017:
संपुर्ण विश्वात आपल्या अद्भुत खेळाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या सायना नेहवाल करीता 2017 हे वर्ष फार आव्हानात्मक ठरले. दुखापत झाल्यामुळे या वर्शी सायना कोणत्याही मोठया टुर्नांमेंट मध्ये सहभागी होऊ शकली नाही. परंतु काही दिवसाच्या विश्रांती नंतर ती पुन्हा नव्या जोशाने आणि जोमाने पुन्हा खेळाकडे परतली आणि मलेशिया ओपन ग्रांड प्रिक्स जिंकुन यश जवळ केले.
2017 सालीच सायना नेहवाल वल्र्ड बॅडमिंटन चँपियन च्या सेमिफायनल पर्यंत पोहोचली परंतु या टुर्नामेंट मध्ये तीला जापान ची बॅडमिंटन खेळाडु नोजोमी ओकूहारा ने हरविले. त्यामुळे या मॅचमधे तीला ब्राँन्ज मेडल वरच समाधान मानावे लागले.
याबरोबर सायना भारताची लागोपाठ 2 ब्राँज मेडल आणि 7 क्वार्टर फाइनल जिंकणारी बॅडमिंटन खेळाडु झाली. 2017 लाच सायनाने 82 व्या नॅशनल बॅडमिंटन चॅम्पीयनशिप स्पर्धेत पी.व्ही. सिंधु ला हरवत यश संपादन केले.
2018 च्या एशिआई खेळांमध्ये मेडल जिंकुन सायनाने रचला इतिहास:
आपल्या आगळया वेगळया खेळातील प्रदर्शनाने मोठ-मोठया दिग्गजांना हैराण करून सोडणाऱ्या सायनाने 2018 साली सुध्दा आपल्या यशाला कायम ठेवले आणि कित्येक नवे रेकॉर्डस् आपल्या नावावर नोंदविले. या वर्षी झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स मधील सेमिफाइनल मध्ये बॅडमिंटन खेळाडु रत्वानोक इन्तानॉन ला हरवुन सायनाने फायनल मध्ये आपली जागा बनविली.
2018 सालीच सायनाला एशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये टाई तजु-यिंग विरूध्द अपयशाचा सामना करावा लागला. त्यामुळे तीला ब्राँज मेडल वर समाधान मानावे लागले. 2018 साली सायनाने कॉमनवेल्थ गेम्स् च्या एकेरी महिला स्पर्धेच्या फायनल मधे बॅडमिंटन खेळाडु पी.व्ही.सिंधुला हरवत सुवर्ण पदक पटकवले.
या व्यतिरीक्त सायना नेहवाल ने याच वर्षी मिश्र दुहेरी प्रतियोगीतेत भारताला आणखीन एक सुवर्ण पदक मिळवुन दिले. 2018 सालीच आयोजित एशिआई खेळांमध्ये सायना ने आपला उत्कृश्ट खेळ दाखवत एशिआई बॅडमिंटन पदक आपल्या नावावर करून पहिली भारतिय महिला बॅडमिंटन खेळाडु होण्याचा गौरव प्राप्त केला.
सायना नेहवाल ने बॅडमिंटन टूर्नामेंट चे प्रतिश्ठित 5 खेळ – ऑलंपिक, एशिआई चँपियनशिप, वल्र्ड चँपियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स्, आणि एशियाई खेळांमध्ये पदकं जिंकत केवळ आपल्या नावावर अनेक रेकॉर्डस् नोंदवले असे नाही तर संपुर्ण विश्वात भारताला गौरव प्राप्त करून दिला.
2018 सालीच सायना डेनमार्क ओपन आणि फे्रंच ओपन चा देखील हिस्सा झाली होती परंतु दोन्हीही टुर्नांमेंट मधे आपल्या तोडीसतोड प्रतिस्पर्धी असलेल्या टाई तजु-यिंग विरूध्द पराभव पत्करावा लागला होता. या शिवाय याच वर्षी सायना ला मोदी आंतरराष्ट्रीय 300 टूर्नामेंट च्या फायनल मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
2019 ला सुध्दा सानियाने आपल्या विजयरथाला पुढे नेले:
सतत यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करणाऱ्या सायना नेहवाल ने 2019 साली इंडोनेशिया मास्टर्स च्या वुमन्स सिंगल्स चा खिताब आपल्या नावावर केला.
सायना नेहवाल ने आपल्या जिवनात अवघड आणि अतिशय कठिण परिस्थीतीचा कणखरपणे सामना केला व यशा-पयशाची चव चाखत आपल्या कारकिर्दीला अत्यंत उंचीवर नेले आणि जगातील सर्वश्रेष्ठ बॅडमिंटन खेळाडुंच्या यादीत आपले नाव कोरले.
सायना नेहवालच्या सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाकरीता तीला अनेकानेक पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आले आहे. सायना ला मिळालेल्या पुरस्कारांची यादी याप्रमाणे आहे.
सायना नेहवाल ला मिळालेले सन्मान – Saina Nehwal Awards
- 2016 साली सायना नेहवाल ला भारतातील सर्वोच्च सन्मानापैकी एक पद्मभुषण पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.
- 2009-2010 ला क्रिडा जगतातील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार ‘‘राजीव गांधी खेळ रत्न’’ पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.
- 2010 ला भारताचा प्रतिश्ठित पद्म पुरस्कार देखील मिळाला.
- 2009 साली सायनाला अर्जृन अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.
- 2008 साली सायना नेहवाल ला बॅडमिंटन वल्र्ड फेडरेशन व्दारे सर्वात उत्कृश्ट आणि प्रतिभावंत खेळाडुचा दर्जा देण्यात आला.
सायना नेहवाल भारताची सर्वश्रेष्ठ बॅडमिंटन खेळाडु तर आहेच त्याशिवाय ती अनेक सुप्रसिध्द कंपन्यांची ब्रँड एंबेसीडर देखील आहे. आणि आपल्या आकर्शक व्यक्तिमत्वामुळे टिव्ही वरील अनेक जाहिरांतीमधील मॉडल म्हणुन देखील ती आपल्याला दिसते.
भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ने आपल्यातील अनन्यसाधारण प्रतिभेमुळे बॅडमिंटन या खेळाला जगभरात एक नवी ओळख मिळवुन दिली. या शिवाय भारतात बॅडमिंटन ला एक लोकप्रीय खेळ म्हणुन ओळख देण्यात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावलीये व या खेळाची प्रतिमा देखील उज्वल केली आहे.
सायना नेहवालच्या अद्भुत आणि अविरत प्रयत्नांमुळेच आज भारता जवळ आपली बॅडमिंटन लीग आहे. सायना भारतातील प्रत्येक खेळाडुकरीता एक प्रेरणास्त्रोत आहे. तिच्यातील खेळाची उर्मी, तिच्यातील जोश, प्रत्येक भारतियात आपल्या ध्येयाला प्राप्त करण्याची उर्जा निर्माण करतं.