
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे शहरातील शिक्षण संस्था आहे. याची स्थापना १८९६ मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे खुर्द या पुण्याजवळील गावात केली. याचे मूळ नाव हिंगणे स्त्री शिक्षण संस्था होते.
या संस्थेने १९९१मध्ये कर्वेनगर येथे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय आणि स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी यांसहित अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या.