महाराष्ट्राची शान असलेल्या जगप्रसिद्ध भारतीय नेमबाज अंजली भागवत

आज आपण या लेखाच्या माध्यमातून आपल्या देशांतील 10 मीटर एअर रायफल या क्रीडा प्रकारातील ‘चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन्स’ अन् ‘महाराष्ट्राची शान’ जगविख्यात निशानेबाज अंजली भागवत यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. अंजली भागवत यांनी हे शिखर गाठण्यासाठी केलेली मेहनत तसचं, या शिखर स्थानी पोहोचण्यासाठी त्यांनी आपल्या अंगी बाळगलेली जिद्द व कठोर मेहनत या सर्व बाबी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

तसचं, एक महिला म्हणून त्या आजच्या युवतींसाठी कश्याप्रकारे एक प्रेरणादायी व्यक्ती ठरू शकतात याबद्दल सविस्तर वर्णन करणार आहोत. आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये मुलांप्रमाणे मुली देखील स्वत:ला सिद्ध करत असल्याचे आपल्या निर्दर्शनात येते. आपल्या देशांतील बऱ्याच महाविद्यालयीन युवती आज भारतीय नेमबाज अंजली भागवत यांच्याकडून प्रेरित होवून या खेळात सहभागी होत आहेत.

अंजली भागवत यांच्या विषयी माहिती – Anjali Bhagwat Biography in Marathi 

मित्रांनो, अंजली भागवत याचं पूर्ण नाव अंजली रमाकांत वेदपाठक भागवत असून, त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९६९ साली मुंबई येथील एक मराठी कुटुंबात झाला. अंजली भागवत यांच्या कुटुंबात आई वडिल आणि एक मोठी बहिण व एक छोटा भाऊ आहे. त्यांच्या आईनी काही काळ ऑल इंडिया रेडिओसाठी काम केलं आहे. त्याचं बालपण हे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात गेलं. अंजली भागवत यांना लहानपणापासून क्रिकेट खेळायला खूप आवडायचं. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अस म्हटलं होत की, क्रिकेट हा आपला धर्म आहे. मी सुद्धा क्रिकेट वेडी आहे.

क्रिकेट हा खेळ आपल्या देशांत असाच प्रसिद्ध झाला नाही तर त्याकरिता भारतीय क्रिकेट बोर्डाला खूप परिश्रम करावे लागले. क्रिकेट खेळा प्रती आवड असलेल्या आणि क्रिकेटची पंढरी असलेल्या शहरात त्यांचे बालपण गेलं असल्याने त्यांची क्रिकेट खेळा प्रती आवड असणे साहजिक बाब आहे. अंजली भागवत याचं बालपण अश्या शहरात गेलं ज्या ठिकाणी नेमबाज या खेळा संबंधी तिळभर देखील कुणालाच माहिती नव्हती. शिवाय, क्रिकेट या खेळा विषयी जितकी माहिती त्यांना होती तितकी नेमबाज या खेळाविषयी माहिती त्यांना नव्हती. अंजली भागवत यांना लहानपणापासून खेळ खेळण्याची खूप आवड होती.

अंजली भागवत यांचे शिक्षण – Anjali Bhagwat Education 

अंजली भागवत या महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना त्यांनी एन. सी. सी.  मध्ये सहभाग घेतला. त्यांना ट्रेकिंग करणे खूप आवडत असे,  शिवाय, त्यात शुटींगचं प्रशिक्षण देखील कंपल्सरी होत. एन. सी. सी अंतर्गत प्रशिक्षण घेत असतांना जेंव्हा त्यांना शुटींग करायला सांगितली तेव्हा त्यांच्या सगळ्या गोळ्या वॉश आऊट गेल्या. तेव्हाचं त्यांनी ठरवलं की, पुन्हा आपण या ठिकाणी येणार नाही. परंतु, एन. सी. सी. मध्ये शुटींग चे प्रशिक्षण कंपल्सरी असल्या कारणामुळे त्यांना  परत त्या ठिकाणी यावच लागल.

अंजली भागवत यांचे करिअर – Anjali Bhagwat Career 

कालांतराने सराव करत करत त्यांची नेमबाजी मध्ये रुची वाढू लागली. शिवाय, त्याना शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्यात फारसा रस नव्हता. अंजली भागवत यांना महाविद्यालयीन काळात नेमबाज प्रशिक्षक म्हणून भीष्मराज बाम सर मिळाले. त्यांनी अंजली भागवत यांना महाराष्ट्र राज्याकडून नॅशनल चॅम्पीयन शिपमध्ये सहभाग घेण्यास विनंती केली. कोणत्याही प्रकारचा सराव केला नसतांना केवळ एक पिकनिक म्हणून अंजली भागवत यांनी  नेमबाज स्पर्धेत भाग घेतला.

या स्पर्धेत त्यांनी सर्वप्रथम सिल्व्हर मेडल जिंकल. केवळ आठ दिवसाच्या परिश्रमाच्या बळावर त्यांनी ही कामगिरी केली. शिवाय, अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महाराष्ट्रीयन नेमबाज खेळाडू ठरल्या. त्यावेळी त्यांना नेमबाजी या खेळाबद्दल बंदूक म्हणजे काय इतकच माहिती होत. या स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर त्यांचा या खेळाप्रती आत्मविश्वास वाढला. अंजली भागवत यांना उद्योग क्षेत्रांत जास्त आवड असल्यामुळे त्याचं उद्योग धंद्यात जास्त लक्ष देत असत.

शिवाय, नेमबाज या खेळाचा त्या दरोरोज अर्धा तास सराव करीत असतं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मागर्दर्शन मिळालं ते चक्रवर्ती सरांकडून. त्याबद्दल आपले भाव व्यक्त करतांना त्या म्हणतात की, मी महाराष्ट्र रायफल असोसिएशन ची खूप ऋणी आहे. त्यांच्यामुळेच आज मी राष्ट्रीय तसचं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहोचू शकले.

अंजली आपले प्रशिक्षक श्री. विश्र्वराज बाम यांच्या बद्दल आभार व्यक्त करतांना सांगतात की, ज्याप्रमाणे माझ्या कुटुंबीयांनी मला नेमबाजी मध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केलं त्याच प्रमाणे माझे गुरु बाम सरांनी देखील मला या शिखर स्तानी पोचविण्यासाठी खूप परिश्रम घेतले. हा खेळ खेळण्यासाठी अत्यावश्यक असणारा मानसिक कणखरपणा जो आज माझ्या अंगी उतरला आहे, तो बाम सरांनीच मला दिला आहे.श्री. बाम यांच्याकडे मानसिक कणखरपणाचे प्रशिक्षण घ्यायला स्नूकर वर्ल्ड चॅम्पीयन श्री. गीत सेठी तसेच श्री. राहूल द्रविड यांच्यासारखे दिग्गज खेळाडू येतात. यावरूनच बाम सरांची ख्याती तुम्हाला समजू शकेल.

अंजली भागवत यांचा विवाह – Anjali Bhagwat Marriage 

मित्रांनो, अंजली भागवत यांचा विवाह सन २००० साली मंदार भागवत यांच्याशी झाला असून या दाप्त्यांना सन २०१० साली एक रत्नप्राप्त झाले. अंजली भागवत यांना त्यांच्या करियर निवडीस त्यांचे पती व सासरच्या मंडळीनी नेहमीच पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी सून म्हणून कोणतीही रूढीवादी भूमिका पार पाडण्याची अपेक्षा केली नाही.

अंजली भागवत यांना मिळालेले पुरस्कार – Anjali Bhagwat Award

अंजली भागवत यांनी आपल्या व्यावसायिक नेमबाजी कारकिर्दीत नेमबाजीच्या क्षेत्रांमध्ये मानाचा समजला जाणारा ISSF चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स पुरस्कार सन २००२ साली म्युन्शेन येथे मिळाला. तसचं, त्यांनी सलग तीन ऑलम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे.

कॉमनवेल्थ खेळामध्ये त्यांनी १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके जिंकली आहेत. तसचं, १० मीटर एअर रायफल आणि स्पोर्ट्‌स रायफल ३ पी प्रकारात त्यांनी आपल्या नावी कॉमनवेल्थ रेकॉर्ड ची नोंद केली आहे. सन २००३ साली आफ्रो-आशियाई खेळांमध्ये, अनुक्रमे क्रीडा ३ पी आणि एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून पहिल्या भारतीय महिला नेमबाज बनण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

Posted in भारतीय वंदनीय महिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *