मांगते चुंगनेजंग मेरी कोम (जन्म: १ मार्च १९८३) ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे.मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे . ह्या स्पर्धेमधील फ्लायव प्रकारामध्ये कोमने कांस्यपदक मिळवले. २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले.
मेरि कोम
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव – मंगते चुंगनेजंग मेरी कोम
राष्ट्रीयत्व – भारतीय
निवासस्थान – इम्फाल, मणिपूर
जन्मदिनांक – १ मार्च, १९८३
जन्मस्थान – कांगथेई, मणिपूर
उंची – १.५८ मी (५)
वजन – ५१ किलो (११० पौंड) (फ्ल्यायवेट व पिनवेट)
देश – भारत
खेळ – बॉक्सिंग
प्रशिक्षक – एम. नरजीत सिंग
पदके
भारत या देशासाठी खेळतांंना
महिला बॉक्सिंग
उन्हाळी ऑलिंपिक
कांस्य २०१२ लंडन फ्लायवेट (५१ किलो)
महिला जागतिक नवशिके बॉक्सिंग अजिंक्यपद
सुवर्ण २०१० ब्रिजटाउन 48 किलो
सुवर्ण २००८ निंग्बो 46 किलो
सुवर्ण २००६ नवी दिल्ली 46 किलो
सुवर्ण २००५ पोडोल्स्क 46 किलो
सुवर्ण २००२ अंताल्या 45 किलो
रौप्य २००१ स्क्रँटन 43किलो
आशियाई महिला बॉक्सिंग अजिंक्यपद
सुवर्ण २०१२ उलानबातर फ्लायवेट
सुवर्ण २०१० अस्ताना फ्लायवेट
रौप्य २००८ गुवाहाटी पाईनवेट
सुवर्ण २००५ काओशियांग पाईनवेट
सुवर्ण २००३ हिस्सार पाईनवेट
आशियाई खेळ
सुवर्ण २०१४ इंचॉन फ्लायवेट (५१ किलो)
कांस्य २०१० क्वांगचौ फ्लायवेट (५१ किलो)
इनडोअर आशियाई खेळ
सुवर्ण २००९ हनोई पाईनवेट
आशियाई चषक महिला बॉक्सिंग स्पर्धा
सुवर्ण २०११ हैको 48 किलो
विच कप सुवर्ण २००२ पेक्स पाईनवेट
२०१३ साली कोमने अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले.२०१४ साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.
जीवन
मणापूरमधील दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये एक गरीब कुटुंबात मेरी कोमचा जन्म झाला. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात कां उतरू नये, असे वाटू लागले. घरचा विरोध असतानाही इ.स. २००० मध्ये १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचॆ बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले;
वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर मेरी कोमने आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिने विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग तिचा जागतिक स्पर्धेतील विजेतेपदांचा धडाका सुरू झाला.
अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुधा त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते. २००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेर्मध्ये, २००५मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने अजिंक्यपद पटकावले. तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिस्पर्ध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८ मध्ये तिने चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले होते.
पुरस्कार
पद्मभूषण (खेळ), 2013
अर्जुन पुरस्कार (बॉक्सिंग), 2006667
पद्मश्री (खेळ), 2006
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2009