छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई – Jijabai. स्वराज्याचा रक्षक ज्यांनी जन्माला घातला. त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
राजमाता जिजाबाईं विषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती –
संपुर्ण नाव (Name): | जिजाबाई शहाजी भोसले |
जन्म: | 12 जानेवारी इ.स. 1598 (Jijamata Jayanti) |
वडिलांचे नाव: | लखुजीराव जाधव |
आईचे नाव: | म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई |
पतीचे नाव: | शहाजीराजे भोसले |
मृत्यु: | 17 जुन इ.स. 1674 रायगडाच्या पायथ्याशी पाचड येथे. |
जिजाबाईं यांचे जीवन चरित्र – Jijamata Biography
जिजामाताचे माहेर बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडचे. जाधव कुटुंब देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज. जिजामाताचा विवाह 1605 साली शहाजीराजां सोबत दौलताबाद येथे झाला.
भोसले आणि माहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी पतिनिष्ठेला महत्व देत माहेरशी कायमचे संबंध तोडले. भावनांना आणि नात्याला बाजुला ठेवुन कर्तव्याला महत्व देत खंबीरपणे व धैर्याने त्या प्रत्येक प्रसंगात उभ्या राहिल्या आणि त्यांचा हाच गुण शिवरायांच्या अंगी देखील आला होता.
शिवाजी महाराजांचा जन्म
जिजामाताना एकुण 8 मुलं झाली त्यात 6 मुली आणि 2 मुलं. आपल्या दिराच्या नावावरून आपल्या मोठया मुलाचे नाव संभाजी असे ठेवले. संभाजी महाराज शहाजी राजांजवळ वाढला.
पुढे 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी गडावर सुर्यास्ताच्या समयाला जिजामाताला पुत्ररत्न प्राप्त झाले . . . छत्रपती शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांवरचे संस्कार आणि राज्यकारभाराची जवाबदारी
छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. त्याची संपुर्ण जवाबदारी जिजामातेन स्वतः उचलली. त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं.
शहाजी महाराजांनी जिजामातेवर पुण्याची जवाबदारी सोपवल्याने त्या शिवाजी महाराजांसमवेत पुणे येथे आल्या. शत्रुचे सततचे हल्ले पुण्यावर होत असल्याने पुण्याची जोखीम वाढली होती परंतु दादोजी कोंडदेवांच्या मदतीने त्यांनी पुण्याची जवाबदारी समर्थपणे पेलली.
पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतक.यांना मदत करणे, तंटे सोडवणे, यांसारख्या जवाबदा.या पार पाडतांना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडणीकडे देखील बारकाईने लक्ष देत.
शिवाजी महाराजांना कर्तृत्ववान योध्यांच्या गोष्टी सांगणे, राम कृष्णाच्या, बलाढय आणि पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर संस्कार करीत होत्या व शस्त्रविद्येत त्यांना निपुण करतांना दादोजी कोंडदेवांसोबत स्वतःदेखील बारकाईने लक्ष ठेवत होत्या.
शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करतांना समान करावा आणि अपराध करणा.याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले.
मोठया मोहिमांवर जेव्हा शिवराय जात तेव्हां राज्यकारभारावर जिजामाता स्वतः लक्ष ठेवत.
शहाजी राजे बंगळुर येथे चाकरीवर असतांना त्या शिवाजी महाराजांच्या आई वडिल दोन्ही ही झाल्या. नेटाने आणि धैर्याने राज्यकारभार सांभाळला. सईबाईंच्या अकाली जाण्याने संभाजीराजांची जवाबदारी सुध्दा समर्थपण पेलली.
राजांच्या लढायांचा, युध्दांचा, स्वा.यांचा सर्व तपशील स्वतः ठेवायच्या. महाराजांच्या मुत्सद्देगिरीत, खलबतांमधे स्वतः जातीने लक्ष घालायच्या. वेळप्रसंगी योग्य सल्ला द्यायच्या.
शिवाजी महाराजांना आग्रा येथे जेव्हां कैद झाली होती त्यावेळी उतारवयात देखील जिजाउं माॅं साहेबांनी राज्याची जवाबदारी अतिशय समर्थपणे पेलली.
आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकरवी पुर्ण करून घेतली आणि त्याकरता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमधे पेरले. महाराजा देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले.
जिजामातेच निधन – Jijamata Death
शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजामातेन 17 जुन इ.स. 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला जणु छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतिक्षा होती.
महाराष्ट्र जशी विरपुत्रांची भुमी आहे तशीच विर मातांची देखील आहे हे राजमाता जिजाउं माॅं साहेबांना पाहुन लक्षात येते.