“शकुंतला देवी” एक अलौकिक व्यक्तिमत्व.
गणित विषय बऱ्याच लोकांना कठीण वाटतो, पण असेही काही लोक असतात कि जे गणितात अव्वल असतात आणि आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या बळावर ते कठीणातील कठीण गणित किंवा आकड्यांचा हिशोब कांही सेकंदात करतात व जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण करतात. अशाच काही व्यक्तींपैकी आपल्या देशाचे नाव जगात मोठे करणाऱ्या महिलांपैकी एक त्या म्हणजे शकुंतला देवी.
शकुंतला देवी यांना “मानवी संगणक” म्हणून सुद्धा ओळखले जाते. कारण त्या कठीणातील कठीण गणित सुद्धा काही सेकंदात सोडवत असत. त्यांच्या या असामान्य प्रतिभेला पाहता त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड मध्ये सुद्धा झालेली आहे. शकुंतला देवी ह्या एक महान गणितज्ञ तर होत्याच सोबतच एक लेखिका, वैज्ञानिक, आणि सामजिक कार्यकर्त्या सुद्धा होत्या. चला तर आजच्या लेखात पाहूया शकुंतला देवींविषयी थोडक्यात माहिती.
शकुंतला देवींचे जीवनचरित्र –
शकुंतला देवी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ साली बंगलोर मध्ये एका ब्राम्हण परिवारात झाला. शकुंतला देवी यांचे वडील सर्कस चे काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत असत. सर्कस च्या कामामधून वेळ मिळाल्या नंतर वडील परिवाराला वेळ देत असत.
शकुंतला देवी जेव्हा ३ वर्षाच्या होत्या तेव्हा वडिलांसोबत पत्ते खेळायच्या याचदरम्यान त्यांच्या वडिलांना आपल्या मुलीच्या बुद्धीची क्षमता कळाली होती.
कारण शकुंतला देवी पत्त्यांवर असलेल्या अंकांना चांगले रित्या आठवण ठेवत होत्या. सोबतच अंकांची जुळवाजुळवी सुद्धा करत होत्या.
या गोष्टींना पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांच्या सर्कस च्या कार्यक्रमातून आपल्या मुलीच्या प्रतिभेला बाहेर काढायचे ठरवले. ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. तसेच शकुंतला देवींविषयी त्यांच्या वडिलांना त्यांच्या मध्ये असलेले गुण आणि कौशल्य लहानपणीच दिसून आले होते.
यानंतर वयाच्या ६ व्या वर्षीच शकुंतला देवींनी मैसूर च्या विद्यापीठात एका मोठ्या कार्यक्रमात गणितात स्वतःची एक वेगळी प्रतिभा दाखवली. याच अलौकिक प्रतिभेच्या बळावर शकुंतला देवी यांच्या वडिलांना तेव्हा १९४४ साली लंडन ला जाण्याची संधी मिळाली.
शकुंतला देवी जश्या मोठ्या होत होत्या तशीच त्यांच्यात असणारी प्रतिभा वाढत होती, आणि या प्रतिभेच्या जोरावर त्यांना विदेशात जाऊन आपल्या गुणांना दाखविण्याची एक संधी मिळत होती.
जशी १९५० ला युरोप, १९७६ ला न्यूयॉर्क, १९८८ मध्ये युनायटेड स्टेट. याचदरम्यान शकुंतला देवींनी जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
मानवी संगणक म्हणून ओळख:
शकुंतला देवी यांनी ५० पेक्षा अधिक देशांमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठात वेगवेगळ्या टेलीविजन वर त्यांच्यात असलेली प्रतिभा दाखवली. शकुंतला देवींना खरी प्रचीती तर तेव्हा मिळाली जेव्हा त्या १६ वर्षाच्या होत्या आणि त्यांनी १३ अंकी संख्यांच्या गुणाकार २८ सेकंदात काढला होता.
तेव्हाच्या एका संगणकाला त्यांनी १० सेकंदांनी हरविले होते. त्यांच्या या प्रतिभेला पाहून तेव्हा त्यांचे नाव १९८२ मध्ये गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड मध्ये लिहिल्या गेले होते.
या प्रसंगानंतर त्यांना बऱ्याच ठिकानांवरून बोलावणे येत होते, कारण प्रत्येकाला त्यांची गणितातील प्रगल्भ प्रतिभा पहावी वाटत होती. आणखी एक असाच प्रसंग पाहायला मिळाला तो अमेरिकेच्या एका विद्यापीठात.
सन १९७७ मध्ये अमेरिकेच्या एका विद्यापीठात शकुंतला देवी यांचा सामना होता, युनिव्हॅक कॉम्प्यूटर शी जे तेव्हाचे सर्वात वेगवान कॉम्प्यूटर म्हणून ओळखले जात असे.
येथे शकुंतला देवी यांना २०१ अंकी एक संख्येचे २३ वे मूळ काढावे लागणार होते, या प्रश्नाला सोडविण्यासाठी शकुंतला देवींना फक्त ५० सेकंद वेळ लागला. तेच युनिव्हॅक कॉम्प्यूटर ने हा प्रश्न ६२ सेकंदांमध्ये सोडविला.
हे पाहून तेथील लोकांना आश्चर्य झाले. कि एक मनुष्य कॉम्प्यूटर ला सुद्धा मागे टाकू शकतो, आणि तेव्हापासूनच शकुंतला देवी यांना “मानवी संगणक” म्हणून ओळखले जाऊ लागले.
शाकुंतला देवी वैयक्तिक जीवन – Shakuntala Devi Life Story
सन १९६० मध्ये शकुंतला देवी यांचा विवाह पश्चिम बंगाल चे एक IAS अधिकारी परीशोत बॅनर्जी यांच्याशी झाला होता, विवाहानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. काही वर्ष त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात गेले,
पण काही वर्षानंतर काही कारणास्तव त्या त्यांच्या पतीपासून वेगळ्या झाल्या आणि १९८० मध्ये आपल्या मुलीला घेवून त्या परत बंगलोर ला आल्या. त्यांच्या मुलीचे नाव अनुपमा बॅनर्जी आहे. बंगलोर मध्ये त्यांनी अनेक अभिनेत्यांना तसेच राजनेत्यांना त्या भविष्यशास्त्राचा अभ्यास करून सल्ला देत असत.
आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना स्वास घेण्यास अडचण आणि किडनी मध्ये वेदना होत होत्या आणि त्यांची तब्येत आणखी खालावत होती, त्यांच्या खालावलेल्या तब्येतीमुळे २१ एप्रिल २०१३ ला त्यांनी अखेरचा स्वास घेतला.
शकुंतला देवींच्या जीवनावर प्रकाश टाकणारा “शकुंतला देवी” हा चित्रपट २०२० साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्यांच्या जीवनातील बरेचश्या गोष्टींवर उजेड टाकला गेला आहे.
शकुंतला देवी यांचे प्रसिद्ध पुस्तके – Shakuntala Devi Books
- द जॉय ऑफ नंबर
- द वर्ल्ड ऑफ होमो सेक्सुअल
- एस्ट्रोलॉजी फॉर यू
- पजल्स टू पजल्स यु
- फन विद नंबर्स