ज्ञानदीपच्या संस्थापिका कै. सौ. शुभांगी रानडे याच्या स्मृतीसाठी शुभांगी आयटी प्रशिक्षण केंद्र ज्ञानदीपमध्ये सुरू होत असून सौ. वृंदा कुलकर्णी व्यवस्थापक म्हणून कार्य करणार आहेत.
या केंद्रात वाचनालय व बाल आणि महिलांसाठी आयटी, इलेक्ट्रॉनिक्स विविध प्रशिक्षण कोर्सेस घेण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण प्रकल्पास डॉ. यशवंत तोरो यांचे मार्गदर्शन लाभणार असून राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. सुनीता माने तसेच ज्ञानदीपच्या सहयोगी प्राध्यापक आणि शिक्षक यात सहभागी होणार आहेत. . – डॉ. सु. वि. रानडे, अध्यक्ष, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली.