कस्तुरबा गांधींचा जीवन परिचय

राष्ट्रपिता महात्मा गांधींची पत्नी म्हणून आपल्या सगळ्यांनाच कस्तुरबा गांधी परिचित आहेत…

खरंतर गांधीजी असं व्यक्तिमत्व होतं ज्यांच्यापुढे कस्तुरबा गांधींचे सारे प्रयत्न झाकोळल्या गेले. पण कस्तुरबा गांधी देशा प्रती निष्ठावान आणि समर्पित राहणारी एक प्रभावशाली महिला होती जी आपल्या निर्भिडते साठी ओळखली जाते.

केवळ एक आदर्श पत्नी म्हणून कस्तुरबा गांधींनी आपल्या पतीच्या सगळ्या अहिंसक प्रयत्नांमध्ये साथ दिली असे नव्हे तर देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून एका विरांगनेप्रमाणे ती लढली, प्रसंगी कित्येकदा तिला तुरुंगात देखील कठोर शिक्षेला सामोरे जावे लागले.

कस्तुरबा गांधी स्वातंत्र्य संग्रामात महिलांच्या आदर्श ठरल्या. चला तर या लेखातून त्यांच्या प्रेरणात्मक जीवनाविषयी अधिक जाणून घेऊया.

कस्तुरबा गांधींचा अल्पपरिचय – Kasturba Gandhi Biography in Marathi

पूर्ण नांव (Name)कस्तुरबा गांधी ‘बा’
जन्म (Date of Birth)11 एप्रिल सन 1869 काठियावाड, पोरबंदर
मृत्यू (Death)22 फेब्रुवारी सन 1944, आगा खां महल, पुणे. भारत
वडील (Father Name)गोकुलदास कपाडिया, व्यापारी
पती (Husband Name)महात्मा गांधी
मुलं (Childrens)हरीलाल,मणिलाल,रामदास,देवदास
आंदोलन (Movement)भारतीय स्वातंत्र्य संग्राम

कस्तुरबा गांधींचा जन्म, सुरुवातीचा काळ आणि विवाह – Kasturba Gandhi History

11 एप्रिल सन 1869 ला कस्तुरबा गांधींचा जन्म पोरबंदर येथील काठियावाड मध्ये गोकुलदास कपाडिया या व्यापाऱ्यांच्या घरी झाला.

वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यावेळेसच्या प्रचलित प्रथेनुसार, त्यांच्या वडिलांनी तिचा विवाह आपला जिवलग मित्र करमचंद गांधी यांचा मुलगा आणि स्वातंत्र्य समराचे महानायक म्हणवले जाणारे महात्मा गांधींशी 1882 ला करून दिला.

विवाह तर झाला परंतु लिहिण्या- वाचण्याचे लहानग्या कस्तूरबाला काहीही ज्ञान नव्हते कारण त्या काळात मुलींच्या शिक्षणाचे चलन नव्हते.

बापुढे बापूंचे देखील चालले नाही

निरक्षर असल्याने विवाहा पश्चात कस्तुरबाला थोड्या संघर्षाचा सामना करावा लागला. त्यांच्या अशिक्षितपणामुळे महात्मा गांधी त्यांच्यावर खूष नव्हते आणि त्याबद्दल ते त्यांना टोमणे देखील मारत असत.

इतकेच नव्हे तर गांधीजींना कस्तुरबाचे अधिक सजणे-साजशृंगार करणे, घराबाहेर जाणे देखील पसंत नव्हते.

लग्नानंतर सुरुवातीलाच गांधीजींनी कस्तुरबांच्या बाहेर जाण्या-येण्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला खरा पण गांधीजींच्या या वागणुकीचा कस्तुरबावर फारसा फरक पडत नसे उलट तिला जिथे जाणे आवश्यक वाटायचे, तिथे त्या जात असत त्यामुळे त्यांच्यासमोर गांधीजींचे देखील काही चालले नाही.

परंतु पुढे महात्मा गांधींनी स्वतःच कस्तुरबांना साक्षर केले त्यामुळे त्यांना हिंदी आणि गुजरातीचे चांगले ज्ञान झाले.

पण लग्नानंतर घरातल्या वाढत्या जवाबदाऱ्यांमध्ये त्या गुरफटत गेल्याने पुढे जास्त शिकू शकल्या नाहीत.

कस्तुरबा गांधींचे कौटुंबिक जीवन आणि मुलं – Kasturba Gandhi History in Marathi

लग्नानंतर जवळपास 6 वर्षांनी 1888  ला कस्तुरबा गांधींनी आपला सगळ्यात मोठा मुलगा हरीलाल ला जन्म दिला.

या वेळी महात्मा गांधी आपल्या वकिलीच्या शिक्षणासाठी लंडन ला होते त्यामुळे कस्तुरबांनी एकटीनेच आपल्या मुलाचे संगोपन केले.

त्यानंतर गांधीजी जेंव्हा विलायतेहून परत आले तेंव्हा 1892 ला त्यांना मणिलाल हा दुसरा मुलगा झाला.

पुढे जेंव्हा वकिलीच्या प्रेक्टिस करता गांधीजींना दक्षिण अफ्रिकेला जावे लागले, त्यावेळी मात्र ते आपल्या सोबत कस्तुरबांना देखील घेऊन गेले.

या दरम्यान कस्तुरबा गांधींनी एका आदर्श पत्नी प्रमाणे आपल्या पतीला प्रत्येक पाऊलावर साथ दिली.

त्यानंतर 5 वर्षांनी 1897 ला कस्तुरबा यांना रामदास च्या रुपात तिसऱ्या मुलाची आणि 1900 मध्ये देवदास या चौथ्या मुलाची प्राप्ती झाली.

दक्षिण अफ्रिकेतील संघर्षात गांधीजींच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या होत्या कस्तुरबा – Kasturba’s support in the South African conflict

साउथ अफ्रिकेत असतांना कस्तुरबांनी महात्मा गांधीजींना समर्थपणे साथ दिली टी एक दृढइच्छाशक्ती बाळगणारी अनुशासन प्रिय करारी महिला होती.

दक्षिण अफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्याया विरोधात त्या केवळ उभ्या राहिल्या असे नाही तर या काळात आंदोलन, उपोषण करून इंग्रज अधिकाऱ्यांना आपल्या समोर वाकण्यास मजबूर केलं.

वास्तविक 1913 साली जेंव्हा कस्तुरबा गांधींनी निर्भीडपणे दक्षिण अफ्रिकेतील भारतीय कामगारांच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले, तेंव्हा त्याची शिक्षा म्हणून त्यांना तीन महिन्यांचा कठोर तुरुंगवास भोगावा लागला.

या शिक्षेदरम्यान अधिकाऱ्यांनी कस्तुरबांना घाबरविण्याचा धमकाविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या दृढनिश्चयी स्वभावापुढे अधिकाऱ्यांचे काहीही चालले नाही.

स्वातंत्र्य आंदोलनात कस्तुरबांची भूमिका – Kasturba Gandhi Contribution Freedom  Struggle

स्वतंत्र झालेला भारत पाहण्याचे स्वप्नं कस्तुरबा गांधींनी देखील पाहीले होते. आणि त्यासाठी घरातील असंख्य जवाबदाऱ्या असतांना देखील स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गांधीजी करत असलेल्या असंख्य प्रयत्नांमध्ये कस्तुरबा गांधी हिरीरीने सहभागी होत असत. 

स्वातंत्र्य समरादरम्यान जेंव्हा-जेंव्हा गांधीजींना तुरुंगवास भोगावा लागला त्यावेळी कस्तुरबांनी आपल्यातील महान नेतृत्व गुणांचा परिचय दिला आणि लोकांना प्रोत्साहीत करून त्यांच्यात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत तेवत ठेवली.

त्या गांधीजींच्या अहिंसक आंदोलना दरम्यान त्यांच्या सोबत जात आणि लोकांना स्वच्छता, शिक्षण, आणि अनुशासन याचं महत्वं पटवून देत असत.

एवढेच नव्हे तर त्या दरम्यान महिलांना चूल आणि मुल यातच कैद ठेवण्यात येई, त्या काळात कस्तुरबाजी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना स्वातंत्र्य आंदोलनात सहभागही होण्याकरता प्रोत्साहित करत असत.

स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे ‘बा’ ना देखील कित्येकदा क्रांतिकारकांच्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे कारागृहात जाऊन शिक्षा भोगावी लागली, तरी देखील त्या कधी आपल्या मार्गावरून डगमगल्या नाहीत व एखाद्या शूर विरांगने प्रमाणे देशाला स्वतंत्र करण्यासाठी लढत राहील्या.

बामहात्मा गांधींना मानत आपला आदर्श – Ideal of  ‘Ba’ is Mahatma Gandhi

कस्तुरबा गांधी आपले पती महात्मा गांधींना आपला आदर्श मानीत असत व त्या त्यांच्या व्यक्तिमत्वाने इतक्या प्रभावित होत्या कि पुढे-पुढे त्यांनी आपल्या जीवनाला देखील बापुंप्रमाणे अत्यंत साधं बनविलं होतं.

गांधीजी कुठलही काम आधी स्वतः करीत आणि नंतर ते इतरांना करायला सांगत असत. त्यांच्यातील या गुणांना पाहून कस्तुरबा फार प्रसन्नं होत आणि त्यांचे अनुकरण करत असत.

कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधीं मधला एक प्रसंग चांगलाच सुपरिचित आहे. जेंव्हा कस्तुरबांची प्रकृती ठीक रहात नव्हती त्यावेळी गांधीजिंनी त्यांना मीठ वर्ज्य करायला सांगितले.

त्यावेळी कस्तुरबांनी बीना मिठाचे अन्न बेचव लागत असल्याची तक्रार केली, पण जेंव्हा त्यांनी गांधीजींनी मीठ वर्ज्य केल्याचे पाहीले तेंव्हा त्या फार प्रभावित झाल्या व त्यांनी मिठाचा त्याग केला आणि आपलं जगणं देखील गांधीजिंप्रमाणे साधं करून टाकलं.

त्या बापूंना आपला प्रेरणास्त्रोत मानीत असत. बापुंसाठी फार कौतुकाचा विषय होती कस्तुरबांमधील कार्यक्षमता आणि कर्मठता – जेंव्हा कस्तुरबा गांधी आपल्या पतींसमवेत दक्षिण अफ्रिकेत वास्तव्याला होत्या.

त्या दरम्यान गांधीजींना कस्तुरबांमधील लपलेल्या सामाजिक, राजकीय क्षमतेचा अंदाज आला व तेंव्हा त्यांना बा मधील देशभक्तीची जाणीव देखील झाली. 

कस्तुरबा आपल्या घरकामात देखील अतिशय निपुण होत्या व आदर्श आई प्रमाणे आपल्या मुलांचे पालन-पोषण देखील करत असत.

त्या अत्यंत प्रामाणिकतेने गांधीजींना सर्व कामांमध्ये मदत करीत असत व स्वातंत्र्य आंदोलनात देखील विरांगने प्रमाणे लढत असत, गांधीजींच्या आश्रमांची देखभाल देखील करत असत,

आणि सत्याग्रहींची सेवा देखील मनोभावे करायच्या, म्हणून लोक त्यांना ‘बा’ म्हणून हाक मारीत असत.

‘बा’ मधील निर्भीडता गांधीजींना प्रभावित करीत असे आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत कस्तुरबा गांधींना महिलांची रोल मॉडल म्हणून पुढे केलं कारण स्वातंत्र्य समरात महिलांचं महत्वं गांधीजी जाणून होते.

कस्तुरबा गांधींनी देखील या कार्याचं महत्वं ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांनी महिलांमध्ये साहस आणि जोश भरला,

महिलांच्या आंदोलनात असण्याचं महत्वं त्यांना पटवून दिलं, त्यांना प्रेरित केलं आणि स्वातंत्र्य समराला नवा आयाम प्रदान केला.

कस्तुरबा गांधींचा मृत्यू – Kasturba Gandhi Death

कस्तुरबा गांधी आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये फार आजारी पडल्या होत्या. 1942 साली गांधीजींच्या “भारत छोडो आंदोलना” दरम्यान ज्यावेळी महात्मा गांधींना अटक करण्यात आली, तेंव्हा कस्तुरबा गांधींनी मुंबईच्या शिवाजी पार्क वर स्वतः भाषण देण्याचा निर्णय घेतला.

वास्तविक त्या ठिकाणी आधी गांधीजी भाषण देणार होते,

परंतु ज्यावेळी कस्तुरबा शिवाजी पार्क वर पोहोचल्या तेंव्हा त्यांना अटक करण्यात आली, तेंव्हा त्या आजारी होत्या.

पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली.

1944 साली त्यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका देखील आला,

आणि त्यानंतर 1944 च्या फेब्रुवारीत जगाचा कायमचा निरोप घेऊन त्या निघून गेल्या…

अश्या तऱ्हेने कस्तुरबा गांधींनी त्या काळात स्वातंत्र्य संग्रामात आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली.

ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येई त्या सुमारास त्या महिलांच्या प्रेरणास्त्रोत बनल्या.

कस्तुरबा गांधींचा आपला असा एक दृष्टीकोन होता.

भारताच्या स्वातंत्र्याचं मोल त्या जाणून होत्या. प्रत्येक पाऊलावर त्यांनी आपले पती मोहनदास करमचंद गांधींना साथ दिली.

‘बा’ सारखे आत्मबलिदान देणारे व्यक्तिमत्व जर गांधीजीं समवेत नसते तर गांधीजींचे अहिंसक प्रयत्न एवढे प्रभावशाली ठरले नसते.

कस्तुरबा गांधींनी आपल्यातील नेतृत्व गुणांचा परिचय देत स्वातंत्र्य समराकरता करण्यात आलेल्या सर्व अहिंसक प्रयत्नांमध्ये स्वतःला समोर ठेवलं.

कस्तुरबा गांधींच्या त्याग, बलिदान, आणि समर्पणाला कधीही विसरता येणार नाही.

त्या अश्या महिला होत्या ज्यांनी कायम आपल्या पतीला पाठींबा दिला,

आणि ते ही तेंव्हा ज्यावेळी महिलांना इतके महत्वं दिल्या जात नव्हते.

आणि त्या काळात गांधीजींनी देखील त्यांना समाजसेवा करण्यापासून कधीही अडविले नाही.

लहानवयात झालेल्या विवाहानंतर देखील कस्तुरबा गांधीं आपल्या जवाबदारी पासून कधीही मागे फिरल्या नाही.

त्या अखेरपर्यंत आपले कर्तव्य बजावत राहिल्या. आणि समाजाची सेवा अखंडितपणे करत राहिल्या.

निश्चितच कस्तुरबा गांधीं आजच्या महिलांकरता प्रेरणास्त्रोत आहे…

Posted in भारतीय वंदनीय महिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *