’’सेवासदन’’ च्या स्मृती जेव्हां कधीही निघतात रमाबाई रानडेंचे नाव ओठांवर आल्याशिवाय राहात नाही. आज त्यांना जन्माला येउन साधारणतः 155 वर्षांच्या वर काळ लोटला आहे आणि त्यांना जाऊन 94 वर्ष झालीत.
गेल्या शतकात होउन गेलेल्या कोणत्या स्त्रियांचे कर्तृत्व लगेच आठवते असा विचार केला तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई टिळक, मादाम कामा, भगिनी निवेदिता यांची नावे आठवतात. पण या नावांमध्ये रमाबाई रानडेंच्या नावाचा उल्लेख झाला नाही तर ही नावे अपुर्ण राहातील.
नाव (Name): | पंडीता रमाबाई महादेव रानडे |
जन्म (Birthday): | 25 जानेवारी 1862 |
मृत्यु (Death): | 25 मार्च 1924 |
जन्मस्थान (Birthplace): | देवराष्ट्रे जिल्हा सातारा |
माहेरचे नाव: | यमुनाबाई कुर्लेकर |
वडिल (Father Name): | माधवराव कुर्लेकर |
पती (Husband Name): | महादेव गोविंद रानडे |
पुर्वाश्रमीची यमुना कुर्लेकर महादेव गोविंद रानडेंशी विवाहबध्द झाली आणि रमाबाई रानडें बनुन संपुर्ण भारतात स्वकर्तृत्वाने प्रसिध्द पावली.
महादेव रानडेंच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे त्यांचे वडील त्यांच्या पुर्नविवाहाकरता प्रयत्न करीत होते. माधवरावांना म्हणजे यमुनेच्या वडिलांना जेव्हां हे समजले त्यावेळी आपली मुलगी पहावी अशी त्यांनी गळ घातली. गोविंदरावांना मुलगी सुन म्हणुन पसंतीस उतरली पण महादेवाला हे मान्य नव्हते.
एक तर यमुना त्यावेळी अवघ्या 10 वर्षांची आणि महादेव रानडे 31 वर्षांचे होते. शिवाय महादेवांना एखाद्या विधवेशी विवाह करावयाची ईच्छा होती (ते विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते) पण वडिलांच्या हट्टापुढे त्यांनी नमते घेतले आणि उभयतांचा विवाह संपन्न झाला.
विवाहा नंतर महादेव रानडेंनी रमाबाईंना शिक्षीत करावयाचे ठरवले आणि स्वतः त्यांना शिकवु लागले रोज रात्री दोन तास ते त्यांना शिकवीत असत. सुरूवातीला त्यांना अक्षरओळख देखील नव्हती पण स्वतःत असलेल्या बुध्दीचातुर्याने आणि अभ्यासाची आवड असल्याने त्यांना शिक्षणाची गोडी लागली.
पुढे महादेव रानडेंना जेव्हां कामामुळे शिकविणे अवघड होउ लागले त्यावेळी सगुणाबाई देव या महिला प्रशिक्षण शाळेच्या शिक्षीका रमाबाईंना शिकविण्यास येऊ लागल्या.
काही काळानंतर महादेव रानडे यांची विशेष न्यायाधिश म्हणुन दुस.या गावी बदली झाली त्यामुळे त्यांना बदलीच्या गावी राहावे लागणार होते. तेव्हां रमाबाईंना इंग्रजी शिकवण्यासाठी वानवडी येथील मिस हरफर्ड या झनाना मिशनच्या शिक्षीकेची नेमणुक झाली.
त्या नियमीत रमाबाईंना तीन साडेतिन तास इंग्रजी शिकवीत असत. त्या शिकवुन गेल्यानंतर घरातील आक्का रमाबाईंना विहीरीवर जाऊन स्नान करावयास सांगत त्याखेरीज त्यांना घरात वावरण्यास मज्जाव करण्यात आला.
रमाबाई आक्कांच्या आज्ञेनुसार रोज शिकवणी झाल्यानंतर विहीरीवर स्नान करू लागल्या त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली.
ही गोष्ट ज्यावेळेस महादेव रानडेंच्या कानावर पोहोचली तेव्हां त्यांनी स्नान करावयाची आवश्यकता नसल्याचे घरच्या मंडळींना सुनावले आणि त्यामुळे आक्कांनी माघार घेतली व शिकवणी झाल्यानंतर विहीरीवरच्या स्नानातुन रमाबाईंची सुटका झाली.
रमाबाईंच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी – Ramabai Ranade Chi Mahiti
रमाबाई मुळातच बुध्दीमान असल्याने काही वर्षांमधेच त्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगलीच कामगिरी केली.
20 व्या वर्षी शिक्षीका नेमण्याकरता शिक्षण खात्याने नेमलेल्या कमेटीत रमाबाईंची वर्णी लागली. या कमेटीत सगळी पुरूष मंडळी होती त्यात एकमेव स्त्री म्हणजे रमाबाई रानडे.
ज्या काळात स्त्री शिक्षण ही वज्र्य गोष्ट समजली जात होती त्या काळात रमाबाई पतीच्या मदतीने उच्चशिक्षीत झाल्या.
केवळ स्वतः शिक्षीत झाल्या असे नव्हें तर इतर स्त्रियांनी शिकावे या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत.
उत्तम गृहीणी म्हणुन भुमिका बजावत असतांना पतीला सामाजिक कार्यात त्यांनी बरोबरीने सहाय्य केले.
रमाबाईंनी मराठी, इंग्रजी, हिंदी, बंगाली या भाषांमध्ये विशेष प्राविण्य मिळविले
महादेव रानडेंच्या कार्यापासुन प्रेरणा घेत रमाबाईंनी स्त्रीयांच्या सुधारणा चळवळीत हिरीरीने सहभाग घेतला
पुण्यात ’सेवा सदन ’ या महिलासंस्थेचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीपणे भुषविले.
मुलींकरता पुण्यामध्ये ’हुजुरपागा’ या शाळेची स्थापना केली.
1901 साली महादेव रानडे यांच्या मृत्युनंतर रमाबाईंनी स्वतःला राष्ट्रकार्याकरता वाहुन घेतले.
रमाबाई पुण्यातील येरवडा मानसिक रूग्णालयाला आणि कारागृहाला वारंवार भेटी देत व तेथील महिलांच्या प्रार्थना सभेला उपस्थित राहुन त्यांचे मनोबल वाढविण्याकरीता प्रयत्न करत
सामाजिक ऋण फेडतांना रमाबाई अनेक रूग्णालयांना भेटी देत असत. आस्थेने रूग्णांची विचारपुस करून त्यांना फळं, पुस्तकं भेट स्वरूपात देत.
बालसुधारगृहांत जाऊन लहान मुलांना संस्कारांचे धडे देत, गोष्टी सांगत, लहान मुलांना खाऊ, मिठाई द्यायच्या.
गुजरात व काठेवाड या ठिकाणी 1913 ला मोठा दुष्काळ पडला होता तेव्हां रमाबाईंनी येथे भेट दिली आणि दुष्काळग्रस्तांना मदत देखील केली.
आषाढी आणि कार्तिकी वारी दरम्यान रमाबाई ’सेवा सदन’ मधील कार्यकत्र्यांसमवेत आळंदीला जायच्या. वारीत आलेल्या वारक.यांवर मोफत औषधोपचार करायच्या.
रमाबाईंचा सामाजिक कार्यातील सहभाग पाहुन अनेक स्त्रियांचा सामाजिक कार्यात सहभाग वाढला.
मंुबई मध्ये 1904 ला अखिल भारतीय महिला परिषद पार पडली त्यावेळी या परिषदेचे अध्यक्षपद रमाबाई रानडे यांनी भुषविले होते.
’सेवा सदन’ च्या अनेक शाखा रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली स्थापीत झाल्या. अनेक रूग्णसेविका या सेवा सदन च्या माध्यमातुन तयार झाल्या.
मुलींची प्रशिक्षण केंद्र, वसतीगृह असे उपक्रम सेवा सदन च्या माध्यमातुन त्यावेळेस राबविले गेले.
रमाबाई रानडे यांचा मृत्यू – Ramabai Ranade Death
1924 साली पुणे येथील सेवा सदन च्या इमारतीत रमाबाईंनी अखेरचा श्वास घेतला.
महिलांच्या आधुनिक चळवळीच्या त्या अग्रणी नेत्या म्हणुन पुढे आल्या होत्या.
महिलांना आर्थिक दृष्टीकोनातुन कुणावरही अवलंबुन राहावे लागु नये याकरीता त्या महिलांना खंबीर आणि स्वावलंबी बनविण्यासाठी कायम प्रयत्न करीत राहिल्या.
हिंदु विधवांकरीता रमाबाई रानडे हया मोठा आधार होत्या ’’त्यांचा मृत्यु ही राष्ट्राची मोठी हानी आहे’’ अश्या शब्दांत महात्मा गांधींनी आपल्या शोक संवेदना त्यावेळी व्यक्त केल्या होत्या
’’आमच्या आयुष्यातील काही आठवणी’’ या पुस्तकात रमाबाई रानडे यांनी त्यांच्या जीवनातील आठवणी सांगीतलेल्या आहेत.