प्रसिध्द कवयित्री संत मुक्ताबाई

महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखले जाते या संतामध्ये ज्याप्रमाणे पुरूषांनी मोठया प्रमाणात समाज घडविण्याचे कार्य हाती घेतले त्याचप्रमाणे यात मोलाची भर घालण्यात स्त्री संत देखील मागे नव्हत्या. अनेक महिला संतांनी देखील समाजाची विस्कळीत घडी नीट बसविण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे.

प्रसिध्द कवयित्री संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती –

या संतांमध्ये संत मुक्ताबाईंचा उल्लेख फार आदराने केला जातो. संत मुक्ताबाई महाराष्ट्रातल्या प्रसिध्द संत कवयित्री म्हणुन परिचीत आहेत.

आई वडिलांच्या देहत्यागानंतर आपले थोरले बंधु संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेवांच्या त्या जणु माऊली झाल्या. आपले दुःख बाजुला ठेवुन इतक्या लहान वयात घरातील एक कर्ती स्त्री म्हणुन त्यांनी कुटूंबाची जवाबदारी उचलली.

निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि सोपानदेवांच्या त्या भगिनी असल्या तरी देखील त्यांच स्वतंत्र असं व्यक्तिमत्व होतं. ज्ञानेश्वरांना बोध देण्याकरता रचलेले मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग प्रसिध्द आहेत. त्यांनी ज्ञानबोध ग्रंथांचे देखील लेखन केले या ग्रंथात आपले वडिल बंधु संत निवृत्तीनाथ आणि त्यांच्यातील संवाद आपल्याला पहायला मिळतो.

यात आलेल्या संदर्भांवरून संत मुक्ताबाईंनी समाधीस्थ होण्यापुर्वी काही काळ अगोदरच या ज्ञानबोध ग्रंथाची निर्मीती झाली असावी असे अभ्यासाअंती आपल्या निदर्शनास येते.

मुक्ताबाई या चांगदेवांच्या गुरू होत्या. त्यांनी योगी चांगदेवांना ’पासष्टी’ चा अर्थ उलगडुन दाखविला त्यामुळे चांगदेव हे मुक्ताबाईंचे शिष्य झाले

मुक्ताबाईंच्या अवघ्या विस वर्षांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग म्हणजे त्यांनी केलेली ब्रम्हगिरी प्रदक्षिणा, त्यांच्या आईवडिलांचा देहत्याग, ज्ञानदेवांनी मुक्ताबाईंना दिलेली सनद, व विसोबा खेचर त्यांना शरण आले हे सांगता येतील

संत ज्ञानेश्वरांची निर्मीती असलेल्या ज्ञानेश्वरीच्या निर्मीतीत मुक्ताबाईंचे फार महत्वाचे योगदान आहे. ज्यावेळी संत ज्ञानेश्वरांनी आत्मक्लेषा मुळे स्वतःला कोंडुन घेतले त्यावेळी “ताटी उघडा ज्ञानेश्वरा”  अशी विनवणी मुक्ताईने ज्ञानदेवांना केली होती.

गोरक्षनाथांच्या कृपेचा देखील मुक्ताबाईंवर वर्षाव झाला होता त्या प्रसंगानंतर मुक्ताबाईंना अमृत संजीवनीची प्राप्ती झाल्याचे सांगीतले जाते.

समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपुर्ण अशी मुक्ताबाईंची अभंग निर्मीती आहे. त्यांच्या सर्वच अभंगांमधुन प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत अश्या त्या रचना असल्याची जाणीव होते. त्यांनी जवळजवळ 40 अभंग लिहीले या अभंगांमध्ये ’ताटीच्या अभंगांचा ’ समावेश होतो. मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणुन आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो.

मुक्ताबाईंनी ताटीचे अकरा अभंग लिहीलेत त्याचप्रमाणे हरिपाठाचे सुध्दा अभंग लिहीलेत. हरिपाठ वाचतांना आपल्या लक्षात येतं हे तर मुक्ताबाईंचे अनुभवकणच होत

अखंड जयाला देवाचा शेजार

कारे अहंकार नाही गेला।

मान अपमान वाढविसी हेवा

दिवस असता दिवा हाती घेसी।। “

संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्या नंतर ज्येष्ठ बंधु निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तिर्थयात्रा करण्याकरता निघाले फिरता फिरता (12 मे 1297) ते तापी नदीच्या तिरावर आले असता अचानक विज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या…..

Posted in भारतीय वंदनीय महिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *