First Female Pilot in India
आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या अग्रेसर झालेल्या आहेत मग ते बस च्या ड्रायव्हर असो की जेट विमान उडविणे असो. सर्वच दूर महिलांनी बाजी मारलेली आहे. आणि महिला ह्या आधीपासून शूर वीर आहेत. त्या राणी लक्ष्मीबाई असोत की सावित्रीबाई फुले. बस फरक एवढाच होता की महिलांना मागील काळात घराच्या बाहेर निघण्याची परवानगी नव्हती, त्यांना फक्त चूल आणि मूल ह्या बंधनात अडकुन ठेवण्यात येत होतं.
स्त्री ही आधीपासूनच कर्तृत्ववान आहेत. आणि आज तर त्यांनी पूर्ण जगाला दाखवून दिले आहे की महिला ह्या सुध्दा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालू शकतात. तर आजचा लेख सुध्दा अश्या महिलेवर आहे ज्या महिलेने भारताची पहिली विमानचालक म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार. तर चला पाहूया.
भारताच्या पहिल्या महिला विमानचालक ह्या सरला ठकराल ह्या होत्या. सन १९३६ साली लाहोर च्या विमानतळावर साडीचा पदर ठीक करत त्या जिप्सी मॉथ विमानात बसल्या जे दोन सीट असलेले विमान होते, डोळ्यांवर चष्मा घालून त्यांनी विमानाची उडाण घेतली. आणि त्याच परिस्थिती मध्ये त्या बनल्या भारताच्या पहिल्या महिला विमानचालक. सरला ठकराल यांचा जन्म १९१४ साली झाला होता. त्यांनंतर सुरुवातीपासूनच त्यांना विमानाची आवड होती.
त्यांनी १९२९ मध्ये दिल्ली येथे उघडलेल्या फ्लाईंग क्लब मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि तेथे त्यांची भेट एका मित्रासोबत झाली आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊन त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांच्या पतीने त्यांना एक प्रोफेशनल विमान चालक बनण्यासाठी प्रोत्साहित केले.
सन १९३९ मध्ये त्यांच्या पतीचे एका विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले. तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ सुरू होता. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांचे दुसरे लग्न लावून दिले. आणि देशाच्या फाळणीनंतर त्या लाहोर वरून दिल्लीला राहायला आल्या. आणि त्यांचे २००८ मध्ये निधन झाले. परंतु त्या त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून गेल्या. आजही कुठे भारताच्या पहिल्या महिला विमानचालक म्हणून नाव येते तेव्हा सरला ठकराल यांचे नाव पुढे येते.