भारतातील पहिल्या महिला डॉक्टर “आनंदी गोपाळ जोशी”

आनंदी गोपाळ जोशींचे आयुष्य साहसाने आणि संघर्षाने भरलेले असुन ह्नदयाला स्पर्श करणारे आहे. त्यांचे व्यक्तिमत्व त्या सर्व महिलांकरता प्रेरणास्त्रोत आहे ज्यांना मोठमोठी स्वप्नं पहायला आवडतं पण समाजाच्या आणि कुटूंबाच्या भितीने त्या स्वतःला घराच्या चार भिंतींमधे कैद करून घेतात.

तो असा काळ होता ज्या काळात स्त्रियांच्या सोडाच पण पुरूषांच्या शिक्षणाला देखील फारसे महत्वं दिले जात नसे, महिलांचे शिक्षण एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते अश्या काळात आनंदी गोपाळ जोशींनी आपल्या स्वप्नाला पुर्ण करण्याकरीता विदेशवारी करत वैद्यकिय पदवी प्राप्त केली आणि वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी 1886 साली डॉक्टर होवुन केवळ आपल्या देशाचा गौरवच वाढविला नाही तर सगळयांकरीता एक आदर्श ठरल्या.

अशी कोणती घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली? कोणत्या प्रसंगाने त्यांच्या मनात डॉक्टर होण्याची भावना तिव्र झाली आणि डॉक्टर होतांना त्यांना कोण-कोणत्या संघर्षांचा सामना करावा लागला? जाणुन घेऊया या लेखात……

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी” –

नाव (Name):आनंदी गोपाळ जोशी
जन्म (Birthday):31 मार्च, 1865, पुणे
मृत्यु (Death):26 फेब्रुवारी 1887, पुणे महाराष्ट्र
पति (Husband):गोपाळराव जोशी
शिक्षण (Education):डॉक्टर्स ईन मेडिसिन
प्रसिध्दी (Award):भारताच्या पहिला महिला डॉक्टर (First Woman Doctor in India)

आनंदी गोपाळ जोशींचा जन्म आणि सुरूवातीचा काळ – Anandi Gopal Joshi Information

भारताच्या या पहिल्या महिला डॉक्टरचा जन्म 31 मार्च 1865 साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयात कल्याण ला एका रूढीपरंपरावादी मराठी कुटूंबात झाला. त्यांच्या परिवारात केवळ संस्कृत भाषा बोलल्या आणि वाचल्या जात असे.

लहानपणी आनंदी ला परिवारातील सदस्य यमुना म्हणुन हाक मारीत असत. त्यांचे वडिल जमीनदार होते. ब्रिटिशांच्या काळात महाराष्ट्रात जमिनदारी पध्दत बंद करण्यात आल्याने त्यांच्या कुटूंबाची अवस्था अत्यंत हालाखीची झाली होती.

आनंदी गोपाळ जोशींचा विवाह आणि त्यांचे शिक्षण – Anandi Gopal Joshi Husband

त्या काळात बाल विवाहाची प्रथा होती, अश्यातच आनंदीच्या कुटुंबियांनी आनंदीचा विवाह तिच्या वयाच्या 9 व्या वर्षी तिच्यापेक्षा वयाने 20 वर्षांनी मोठया गोपाळराव जोशी या विधुराशी लावण्यात आला.

लग्नानंतर यमुनेचे नाव बदलुन आनंदी ठेवण्यात आले आणि आनंदी गोपाळ जोशी या नावाने ती ओळखल्या जाऊ लागली. आनंदीबाईंचे पति गोपाळराव पोस्ट ऑफिसात कर्मचारी होते तव्दतच उच्च विचारांचे व्यक्तिमत्व होते.

आनंदी बाईंच्या शिक्षणात त्यांचे योगदान अतिशय महत्वपुर्ण होते. ते नसते तर कदाचित आनंदी बाईंच्या मनात शिक्षणाप्रती एवढी गोडी निर्माणच झाली नसती.

या घटनेने आनंदी गोपाळ जोशींना बनविले डॉक्टर – First Woman Doctor in India

विवाहानंतर वयाच्या 14 व्या वर्षी आई होण्याचे सौभाग्य त्यांना प्राप्त झाले.

त्या काळात डॉक्टर मंडळी पुरूषच असल्याने स्त्रियांना आपल्याला होणा.या त्रासाबद्दल त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येत नसे,

त्यांची घुसमट होत असे.अश्यात आनंदीबाईंनी एक मुलाला जन्म दिला.

परंतु दुर्देवाने अवघ्या दहा दिवसातच उपचारांच्या अभावी त्यांच्या बाळाचा मृत्यु झाला.

बाळाच्या मृत्युचा आनंदीबाईंना जोरदार धक्का बसला. या घटनेने त्यांना नखशिखांत हादरवुन सोडले.

महिलांच्या आणि बालकांच्या उपचाराबद्दल त्या विचार करू लागल्या.

वैद्यकिय क्षेत्रात त्यांची रूची वाढु लागली व त्यांनी शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

त्या सुमारास भारतात अॅलोपॅथीक डॉक्टरीच्या अभ्यासक्रमाची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती आणि म्हणुन वैद्यकिय शिक्षण घेण्याकरीता त्यांना विदेशात जावे लागले.

आनंदीबाईंच्या या निर्णयाचे गोपाळरावांनी पुर्ण समर्थन केले आणि त्यांच्या बाजुने उभे राहिले.

रूढीवादी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले:

ज्यावेळी आनंदीबाईंनी वैद्यकिय शिक्षणाची पदवी घेण्याचे ठरविले त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती त्यामुळे त्यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. रूढी परंपरांना महत्व देणारा समाज आनंदीबाईंच्या या निर्णयाच्या विरोधात उभा राहिला.

एक विवाहीत महिला विदेशात जाऊन वैद्यकिय शिक्षण घेणार हे त्यांना कदापी मान्य नव्हते.

आनंदी आणि गोपाळराव विदेशात जाऊन धर्मांतर करतील अशी समाजातील लोकांना भिती वाटत होती.

आनंदीबाईंना ज्यावेळी या गोष्टी समजल्या त्यावेळी त्यांनी सिरमपुर महाविद्यालयात लोकांना एकत्र केली आणि आपली बाजु त्यांच्यासमक्ष ठेवली व लोकांना महिला डॉक्टरचे महत्व पटवुन दिले.

त्यांनी लोकांना हे देखील समजविले की त्या केवळ वैद्यकिय शिक्षण घेण्याकरीता विदेशात जात आहेत.

धर्मपरीवर्तन करण्याचा किंवा विदेशात नौकरी करण्याचा त्यांचा विचार नाही त्याउलट आपल्या देशात येऊन लोकांची सेवा करावी असा त्यांचा मानस आहे, भारतात एक ही महिला डॉक्टर नसल्याने शेकडो स्त्रियांचा आणि लहान बालकांना जीव गमवावा लागत आहे.

त्यांच्या विचारांनी लोक प्रभावित होऊ लागले आणि त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देखील देऊ लागले शिवाय आनंदीबाईंना मदत करण्याकरीता देखील लोक पुढे येऊ लागले.

आनंदीबाईंचा अमेरिकेतील संघर्षपुर्ण प्रवास:

भारतियांचा रोष पत्करून आनंदीबाई अखेरीस आपले डॉक्टर होण्याचे स्वप्नं उराशी बाळगुन 1885 साली वैद्यकिय शिक्षणाकरीता अमेरिकेला पोहोचल्या.

अमेरिकेच्या वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पनेसिलवेनिया येथे त्यांनी प्रवेशअर्ज भरला त्यानंतर त्यांना या कॉलेज मधे प्रवेश देण्यात आला.

11 मार्च 1886 ला आनंदीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण करून एमडी (डॉक्टर ऑफ मेडिसीन) वैद्यकिय पदवी प्राप्त केली परंतु अमेरिकेत देखील समस्यांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही.

तेथे राहतांना अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला.

हाडे गोठवणा.या थंडीत तेथील खाणे पिणे त्यांना सोयीचे नसल्याने त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत गेला.

त्यांची प्रकृती सातत्याने खराब होत गेली आणि त्या ’टयुबरक्युलाॅसीस’ रोेगाच्या बळी पडल्या.

About Anandi Gopal Joshi

आरोग्याची साथ नसतांना देखील त्यांचा दुर्दम्य आशावाद त्यांना ताकद पुरवित राहीला.

अशक्याला शक्य करीत त्या पदवी घेऊन भारतात परतल्या आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या.

भारतात परतल्यानंतर त्या रूग्णांची सेवा करू लागल्या.

अल्बर्ट एडवर्ड रूग्णालयात, प्रिंसलि स्टेट आॅफ कोल्हापुर येथे महिला डॉक्टर म्हणुन त्यांनी कामाची जवाबदारी स्विकारली. या नंतर काही दिवसांमधेच त्या क्षयरोगाने ग्रस्त झाल्या.आणि त्यातच 26 फेब्रुवारी 1987 ला वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

भारतात स्त्रियांना आणि लहान मुलांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता त्या आयुष्यभर संघर्ष करीत राहील्या आणि भारतातल्या पहिल्या डॉक्टर बनल्या. त्यांच्या सन्मानार्थ इंस्टिटयुट फाॅर रिसर्च अॅण्ड डाॅक्युमेंटेशन इन सोशल सायन्स आणि लखनौ येथील एका गैर सरकारी संस्थेने वैद्यकिय क्षेत्रात आनंदीबाई जोशी सन्मान देण्यास सुरूवात केली.

या व्यतिरीक्त महाराष्ट्र शासनाने देखील आनंदीबाई जोशींच्या नावाने तरूण महिलांकरीता एक फेलोशिप प्रोग्राम ची सुरूवात करत त्यांना विशेष सन्मान दिला.

आनंदीबाई गोपाळ जोशींचे व्यक्तिमत्व खरोखर सर्वांकरीता एक प्रेरणास्त्रोत आहे!

Posted in भारतीय वंदनीय महिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *