आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून समाज प्रबोधन करण्यासाठी ज्ञानदीप फौंडेशनने खालील संकेत स्थळे निर्माण केली आहेत.ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. सांगली या वेबसाईट व सॉफ्टवेअर विकसित करणार्या संस्थेने फौंडेशनच्या कामास सहकार्य म्हणून या संकेत स्थळांच्या निर्मितीत बहुमोल सहकार्य केले आहे.
१) संस्कृत शिक्षणासाठी www.sanskritdeepika.org
२) विज्ञान शिक्षणासाठी www.vidnyan.net
३) मराठी साहित्य व संस्कृती जगभर पोहोचविण्यासाठी www.mymarathi.com
४) सांगली शहराची सर्व माहिती मराठीतून देणारी वेबसाईट www.mysangli.com
५) शालेय स्तरावरील सर्व विषयांचे मराठीतून मोफत शिक्षण देण्यासा्ठी www.school4all.org या वेबसाईटची निर्मिती.
६) दूरस्थ शिक्षण व विविध शिक्षणसंस्थांना माहिती तंत्रज्ञानाच्या सुविधा पुरविण्यासाठी www.dnyandeep.net
७) पर्यावरण पोषक ग्रीन बिल्डिंग व ग्रीन सिटी यांचा प्रसार करण्यासाठी www.green-tech.biz
फौंडेशनने आतापर्यंत मराठीतून विज्ञानप्रसारासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले असून पर्यावरण व बांधकाम क्षेत्रासाठी खालील परिसंवाद घेतले आहेत.
१. यूज ऑफ सोलर एनर्जी इन बिल्डींग (सूर्यशक्तीचा घरबांधणी क्षेत्रात वापर) के. आय. टी., कोल्हापूर
२. ग्रीन बिल्डींग डिझाईन (हरित गृहरचना) हॉटेल पॅव्हेलियन, कोल्हापूर
३. ड्रीम ऑफ ग्रीन सिटी (स्वप्न हरित नगरीचे) हॉटेल सिनेटर, कोथरूड, पुणे
४. ग्रीन बिल्डींग डिझाईन, इंजिनीअर्स ऍंड आर्किटेक्ट्स असोसिएशन, नाशिक
५. शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’ग्रीन-टेक २००९ ’ हे कार्यसत्र
६. बॅंकॉक, थायलंड येथे ’ग्रीन-टेक २०१० ’ ही आंतरराष्ट्रीय परिषद व ग्रीन टेक्नॉलॉजी विषयक ७ दिवसांचा अभ्यास दौरा.
७. दुबई येथे ’ग्रीन-टेक २०११ ’ ही आंतरराष्ट्रीय परिषद व ग्रीन टेक्नॉलॉजी विषयक ५ दिवसांचा अभ्यास दौरा.
याशिवाय हुपरी, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर, सांगली येथे स्थानिक संस्थांच्या परिसंवादात सहभाग घेतला आहे.
ज्ञानदीप एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फौंडेशनतर्फे संस्थेच्या विश्वस्त कै. सौ. शुभांगी सु. रानडे यांच्या खालील पुस्तकांचे प्रकाशन
१. काव्यदीप कवितासंग्रह
२. ’सांगावा’ कवितासंग्रह
३. ’संस्कृतदीपिका’ मराठी- संस्कृत शब्दकोश
४.’सया’ कवितासंग्रह
ज्ञानदीप एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फौंडेशन अनेक शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांशी शिक्षण, संशोधन तसेच समाज प्रबोधनासाठी सहकार्य करीत आहे.